विज्ञान दिनानिमित्त ऑनलाइन पर्यावरण संरक्षण पोस्टर स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:49 AM2021-03-01T04:49:30+5:302021-03-01T04:49:30+5:30
शिवाजी हायस्कूल गोभणी येथे ‘ पर्यावरण संरक्षण : काळाची गरज’ या विषयावर आधारित स्पर्धेत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ...
शिवाजी हायस्कूल गोभणी येथे ‘ पर्यावरण संरक्षण : काळाची गरज’ या विषयावर आधारित स्पर्धेत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अतिशय सुंदर अशी पोस्टर बनवत पर्यावरणाचे सरंक्षण करण्यासाठी एक वेगळा संदेश दिला. यात हवा, पाणी, माती प्रदूषण, पाणी वाचवा, झाडे लावा झाडे जगवा, पृथ्वी वाचवा, प्राण्यांचे संवर्धन करा, प्लास्टिक टाळा, आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता राखा, नियमित व्यायाम करा, शुद्ध हवा, शुद्ध पाणी, निरोगी आरोग्याची हमी, पाणी आडवा पाणी जिरवा इत्यादी पर्यावरण पूरक संदेश दिले. शाळा बंद असतानासुद्धा जवळपास ११७ मुलांनी पोस्टर बनवले. यातून मुलांची विज्ञानविषयी असलेली आवड स्पष्ट झाली. सदर स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक काळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले, तर शाळेचे विज्ञान शिक्षक सुरेश केनवडकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.