हळद पीक संरक्षण तंत्रज्ञान विषयावर ऑनलाइन शेतकरी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:30+5:302021-09-21T04:47:30+5:30

प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी कृविकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे, तर विशेष अतिथी म्हणून हळद पिकातील अनुभव कथन करण्याकरिता प्रगतिशील ...

Online farmer dialogue on turmeric crop protection technology topics | हळद पीक संरक्षण तंत्रज्ञान विषयावर ऑनलाइन शेतकरी संवाद

हळद पीक संरक्षण तंत्रज्ञान विषयावर ऑनलाइन शेतकरी संवाद

Next

प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी कृविकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे, तर विशेष अतिथी म्हणून हळद पिकातील अनुभव कथन करण्याकरिता प्रगतिशील हळद उत्पादक शेतकरी डॉ. गजानन ढवळे शिरपूर जैन यांची उपस्थिती लाभली. या प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कृविकेचे कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी भूमिका पार पाडली. उद्घाटन सत्रात डॉ. रवींद्र काळे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना तज्ज्ञांच्या मार्फत दिले जाणारे हळद पीक संरक्षणासाठी कमी खर्चाचे तंत्रज्ञान अंगीकार करून इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे याप्रसंगी आवाहन केले. तांत्रिक सत्रामध्ये राजेश डवरे यांनी हळद पिकावरील कंदमाशी, खोड किडा, हुमनी पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळी, पिकावरील सूत्रकृमी इत्यादी किडींची ओळख, जीवनचक्र, नुकसानाचा प्रकार यावर प्रकाश टाकून हळद पिकावरील कंदकूज व करपा इत्यादी रोगाच्या संदर्भातील रोगाच्या प्रादुर्भावाची कारणे, लक्षणे व उपाययोजना याविषयी विस्तृत विवेचन केले.

Web Title: Online farmer dialogue on turmeric crop protection technology topics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.