खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 03:08 PM2020-05-07T15:08:33+5:302020-05-07T15:08:40+5:30
कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्या शास्त्रज्ञांनी खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन सुरू केले आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वाशिम: सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे या रोगला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठीच लॉक डाऊन सुरू आहे. अशात शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन अशक्य आहे. त्यामुळेच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठासह कृषी विज्ञान केंद्र वाशिमच्या शास्त्रज्ञांनी खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांना आॅनलाईन मार्गदर्शन सुरू केले आहे. यासाठी ऑडिओ कॉन्फरन्सचा आधार घेतला जात आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने शेतकरी मशागतीची कामे समुहाने एकत्र येऊन करू शकत नाहीत. तथापि, कृषी निविष्ठांची जुळवाजुळव करून ठेवण्यासाठी नियोजन करण्याचा हा कालावधी. या खरीप हंगामात करतात शास्त्रोक्त शिफारशीत तंत्रज्ञानावर आधारित कमी खर्चाच्या निविष्ठांची निवड करून तसेच शिफारशीत कमी खर्चाचे तंत्रज्ञान अंगीकार करून शेतकरी बंधूनी निव्वळ नफा वाढवावा, हा उद्देश समोर ठेवून वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषि विज्ञान केंद्र वाशिम यांनी संयुक्तरित्या शेतकरी ऑडिओ कॉन्फरन्सचे आयोजन ६ मे रोजी केले. त्यात महिनाभरावर असलेल्या खरीप हंगामात बियाण्याची, जातीची निवड, बियाण्याला बीज प्रक्रिया कशी करावी उगवण क्षमता तपासणी आदिंबाबत डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्र,वाशिमचे कीटक शास्त्रज्ञ राजेश डवरे यांनीखरीप पिकातील प्रतिबंधात्मक पीक संरक्षण तंत्रज्ञान या विषयावरऑडिओ कॉन्फरन्स मध्ये सहभागी शेतकºयांना मार्गदर्शन केले.
३१ गावांतील शेतकºयांचा सहभाग
खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर नियोजनाबाबत मार्गदर्शनासाठी पीकेव्ही आणि कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या ऑडिओ कॉन्फरन्समध्ये ३१ गावांतील शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला. शेतकºयांनी आपल्या घरातच बसून फोनद्वारे, खरीप पूर्व नियोजन प्रतिबंधात्मक कीड व रोग व्यवस्थापन तसेच कमी खर्चाचे प्रतिबंधात्मक पीक संरक्षण तंत्रज्ञान याबाबत प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन विलास सवाणे, यांनी केले.