प्रशिक्षणासाठी ऑनलाइन माहिती मागविली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:41 AM2021-01-19T04:41:28+5:302021-01-19T04:41:28+5:30
०००००००० ४ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश वाशिम : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी २० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या ...
००००००००
४ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
वाशिम : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी २० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार जिल्हा दंडाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी १८ जानेवारी रोजी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले.
०००० ००००
वाशिम येथे गोरसेनेचे साखळी उपोषण
वाशिम : कृषी कायद्याच्या विरोधात मागील ५० दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून २० जानेवारीपासून गोरसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले जाणार असल्याची माहिती गोरसेना जिल्हा उपाध्यक्ष आशिष राठोड यांनी दिली. यासंदर्भात १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
०००० ००००
दिव्यांगांनी तपासणीपूर्वी नोंदणी करावी!
वाशिम : कोरोना विषाणू संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थिव्यंग दिव्यांग प्रमाणपत्र बोर्ड येथे तपासणीसाठी येणाऱ्या अस्थिव्यंग दिव्यांगांची नोंदणी करून त्यांना तारीख व वेळ दिली जाणार आहे. यापुढे अस्थिव्यंग दिव्यांगांनी तपासणीला येण्यापूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सोमवारी केले.
०००० ००००
४६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
मालेगाव : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या जवळपास ४६ चालकांवर १८ जानेवारी रोजी मालेगाव पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले.