‘पुरावा कायद्यातील कबुली जबाब’ विषयावर ऑनलाईन व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:41 AM2021-03-31T04:41:56+5:302021-03-31T04:41:56+5:30
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग हर्षल पोले यांनी कबुली जबाबाविषयी विविध तरतुदींचे सखोल मार्गदर्शन करताना कबुलीजबाब म्हणजे ...
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग हर्षल पोले यांनी कबुली जबाबाविषयी विविध तरतुदींचे सखोल मार्गदर्शन करताना कबुलीजबाब म्हणजे काय, कबुली जबाब कसा नोंदविला जातो, त्याचे प्रकार, कबुली कोण नोदवितो, तो केव्हा ग्राह्य धरला जातो? याविषयी विविध उदाहरणांचे दाखले देऊन अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना विधि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुशांत चिमणे यांनी कबुली जबाबाचे फौजदारी आणि दिवाणी प्रक्रियेमध्ये काय महत्त्व आहे हे विषद केले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री धुमाळे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. ललिता दाभाडे आणि तांत्रिक साहाय्य डॉ. सागर सोनी यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा. संजय इढोळे, महादेव सोमाणी, इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.