‘कोरोना : मी व माझी जबाबदारी’ विषयावर ऑनलाइन व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:40 AM2021-05-10T04:40:39+5:302021-05-10T04:40:39+5:30
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ‘रासेयो प्लस टू’चे विभागीय समन्वयक प्रा. विशाल जाधव उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक ...
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ‘रासेयो प्लस टू’चे विभागीय समन्वयक प्रा. विशाल जाधव उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक प्रा. डाॅ. योगेश पोहोकार, प्रा. विलास गांजरे यांची उपस्थिती राहील. कोरोना काळात काय करावे, काय करू नये, स्वत:सोबतच कुटुंबाचे रक्षण कसे करावे, जागरूक युवक, विद्यार्थी म्हणून स्वत:प्रति, कुटुंबाप्रति, समाज वा देशाप्रति काय जबाबदारी असेल, स्वत:सोबत कुटुंब व पर्यायाने सामाजिक संतुलन कसे राखावे, आदींबाबत प्रमुख वक्ते तथा अ. भा. अंनिस युवा शाखेचे राज्यसंघटक, समुपदेशक पंकज वंजारे मार्गदर्शन करतील. लॉकडाऊन काळात गतवर्षी वर्धा जिल्ह्यातील निवारागृहातील ४०० पेक्षा जास्त आश्रितांचे वंजारे यांनी समुपदेशन केले होते. यासाठी त्यांना राज्य शासनातर्फे गाैरविण्यात आले. तेच या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून लाभले आहेत. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाचा लाभ सर्व प्राचार्य, प्राध्यापक, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी यांनी महाविद्यालयातील रा.से.यो. स्वयंसेवक व इतर सर्व विद्यार्थ्यांना करवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.