‘भटक्या विमुक्तांची सद्य:स्थिती आणि प्रबोधनाची दिशा’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:40 AM2021-04-21T04:40:38+5:302021-04-21T04:40:38+5:30
याप्रसंगी सत्यपाल महाराजांनी कोरोनाग्रस्त काळात स्वतःचा जीव वाचविणे कसे गरजेचे आहे, असे सांगून सरकार सांगत असलेल्या सूचनांचे पालन करा. ...
याप्रसंगी सत्यपाल महाराजांनी कोरोनाग्रस्त काळात स्वतःचा जीव वाचविणे कसे गरजेचे आहे, असे सांगून सरकार सांगत असलेल्या सूचनांचे पालन करा. लग्नात गर्दी करू नका, मयतासाठी विनाकारण जमू नका, पाचवी, तेरवी, वाढदिवस साजरा करू नका, यात्रा, कुंभमेळ्यात जाऊ नका, असे आवाहन केले. आज विमुक्त- भटके दिशाहीन जगत आहे, शिक्षणापासून वंचित होतं आहे, प्रचंड व्यसनाधीनता प्रत्येकांच्या घरात घुसलेली आहे, मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेनी समाजाला विळखा घातला आहे, अनेक बुवा-बाबा समाजात घुसून समाजाला लुटत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे आदी समस्यांचे वर्णन करून त्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड यांनी विमुक्त भटक्यांचे वाली कोणी नाही. ते आजही भयाण अवस्थेत जगत आहे. या समस्येतून बाहेर निघण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे परिचय डॉ. विजय जाधव, वाशीम यांनी करून देताना आतापर्यंत तांडा सुधार समितीच्या प्रयत्नाने प्रत्येक वाडीवस्तीत रस्ते, पाणीपुरवठा, समाजभवनासारखे काम सरकारनी हातात घेतले आहे. कोरोनाच्या काळातही स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तेरा आय.पी.एस. अधिका-यांचे कार्यक्रम घेऊन मार्गदर्शन मिळवून दिले, विद्यार्थी दत्तक पालक योजना सुरू केली. शाहीर संमेलन घेऊन शाहिरांचा सन्मान केला या व अशा अनेक तांडा सुधार समितीने केलेल्या कामाची माहिती दिली. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून प्रा. डॉ. रमेश राठोड अकोला, सत्यपाल महाराजांचे गुरूबंधू पंकजपाल महाराज यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपतभाऊ राठोड, नागपूर यांनी केले तर आभार विनोद गुरुजी, बुलडाणा यांनी मानले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक ग. ह. राठोड, प्रमोद वाळके, सर्जनादित्य मनोहर, नवनाथ गायकवाड, डॉ. प्रियदर्शनी देशमुख, प्रा. स्वप्निल काळबांडे, ज्येष्ठ बंजारा कवी श्रावण जाधव, नामा बंजारा, सुप्रसिद्ध बंजारा शाहीर प्राचार्य, वसंत राठोड, सत्यशोधक समाजाचे प्रा. शाम मुडे, अबरसिंग चव्हाण, राजपाल राठोड, डॉ. यशपाल राठोड, कैलास जाधव, डॉ. भावना राठोड, रेणू जाधव, अरुणा जाधव, प्रा. ताराचंद जाधव, मोहन जाधव, कविवर्य अनिल जाधव आदी मान्यवरांची उपस्थिती होती.