संभाजी ब्रिगेडच्या विद्यार्थी आघाडीची ऑनलाइन बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:42 AM2021-05-09T04:42:42+5:302021-05-09T04:42:42+5:30
अनेक वर्षांपासूनचा लढा, ५० हून अधिक तरुणांचे बलिदान आणि ६० हून अधिक शांतीपूर्ण मोर्चे काढल्यानंतर मिळालेले मराठा आरक्षण उच्च ...
अनेक वर्षांपासूनचा लढा, ५० हून अधिक तरुणांचे बलिदान आणि ६० हून अधिक शांतीपूर्ण मोर्चे काढल्यानंतर मिळालेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकूनही सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविले. या प्रश्नी बाजू मांडताना महाराष्ट्र सरकार कुचकामी ठरले आहे. त्यास केंद्र सरकारही तितकेच जबाबदार असून, दोन्ही सरकारांचा जाहीर निषेध करीत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया बैठकीत उमटल्या. संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हा कोषाध्यक्ष अभिषेक घायाळ यांनी सर्व उपस्थित मंडळींचे स्वागत केले, तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश अवचार यांनी प्रास्ताविक केले. आरक्षण रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या विकासाला खीळ लावणारा असल्याचे मत, यावेळी संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रसाद देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा संघटक सोमनाथ परांडे, कार्याध्यक्ष विठ्ठल मानमोठे, शहराध्यक्ष नीलेश वानखडे, संतोष वाघ, अनिकेत देशमुख, शुभम खडसे, ओम देशमुख, सौरभ नागरे, नागेश गरकळ आदी उपस्थित होते.