गरजुंना तातडीने मोफत रक्तदान देणारा आॅनलाईन ‘मोरया ब्लड डोनर गृप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:34 PM2018-06-20T13:34:49+5:302018-06-20T13:34:49+5:30
वाशिम : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजून शहरातील काही युवकांनी ‘आॅनलाईन ब्लड डोनर गृप’ व्दारे शेकडो रुग्णांचे प्राण वाचविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. गत दोन वर्षांपासून सतत सुरु असलेल्या या गृपच्या माध्यमातून गरजुंना मोफत रक्त मिळत असल्याने या गृपचे विविध स्तरातून कौतूक केल्या जात आहे.
- नंदकिशोर नारे
वाशिम : रक्तदान सर्वश्रेष्ठ दान समजून शहरातील काही युवकांनी ‘आॅनलाईन ब्लड डोनर गृप’ व्दारे शेकडो रुग्णांचे प्राण वाचविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. गत दोन वर्षांपासून सतत सुरु असलेल्या या गृपच्या माध्यमातून गरजुंना मोफत रक्त मिळत असल्याने या गृपचे विविध स्तरातून कौतूक केल्या जात आहे.
वाशिम शहरामध्ये दररोज अनेकांना रक्ताची गरज भासते. अशावेळी स्थानिक रुग्णालयामध्ये रक्ताची कमतरता, गरजुंच्या नातेवाईकांची धावपळ पाहता काही युवकांनी पुढे येवून हा गृप तयार केला आहे. तसेच आजही अनेकांमध्ये रक्त देण्यासाठी मागे-पुढे पाहिले जाते. अनेकांमध्ये याबाबत गैरसमज दिसून येतात. या गृपव्दारे रक्तदान करणे आरोग्यासाठी किती हितकारक आहे याबाबत मार्गदर्शनही केल्या जाते. वाशिम येथील महेश धोंगडे व नारायण व्यास यांनी गत दोन वर्षापूवी याग्रुपची सुरुवात करुन सतत गोर गरीब व गरजू लोकाना विनामुल्य रक्तदान रक्तदात्याच्या मार्फत केल्या जात आहे. सुरुवातीला या ग्रुपमध्ये जवळपास पाच ते दहा लोकांचा समोवश होता . दिवसेंदिवस फेसबुक, वॉटसअॅपव्दारे या ग्रुपची मोठया प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली आणि गरजू लोकाना याचा लाभ मिळवून देण्यात आला. या ग्रुपव्दारे आतापर्यंत १५० गरजू लोकांना रक्त पुरविण्यात आले.
हा ग्रुप सध्या आॅनलाईन माध्यमातून चालू आहे . कुठल्याही रुग्णाला २४ तास कधीही रक्ताची आवश्यकता असल्यास वॉटसअॅप ग्रुपला एक एसएमएस करून किेंवा एक फोन केल्यास संबधिताला विनामुल्य रक्तदान करणारा व्यक्ती उपलब्ध करुन दिल्या जातो.
आगळा-वेगळा रक्तदान दिवस केला साजरा
या ग्रुपचा माध्यमातून जागतिक रक्तदान दिवसानिमित्त ग्रुपचे संस्थापक महेश धोंगडे व ग्रुपचे सक्रीय कार्यकर्ता अक्षय हजारे यांनी आवश्यक अपघाती रुग्णाला रक्तदान करून जागतिक रक्तदान दिवस साजरा केला. जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये फळे तसेच बिस्कुट वाटपही केले. यावेळी महेश धोगंडे , नारायण व्यास, अक्षय हजारो, आनंद भावसार, विक्री गायकवाड, गजानन धोगंडे, लोनसुने, रवि धोगंडे, अजय कलवार, किसन इंगोले, किशोर धोगंडे, प्रदिप देवकर, अमोल खडसे, अजय नंदपुरे, गणेश धोगंडे, वसंता शिंदे, अक्षय धोगंडे, अनिल दाण,े चेतन तिवारे, दत्ता मोहळे, विशाल वानखेडे, अनिल राठी, गजानन सुर्वे या गृपमधील सदस्यांची उपस्थिती होती.
कुठल्याही प्रकारे रक्त न मिळाल्याने कोणाचाही जीव जावू नये. यासाठी या गृपची स्थापना करण्यात आली असून हा गृप ईतरांनाही माहित असावा यासाठी व रक्तदानाचे महत्व सांगण्यासाठी गृपव्दारे जनजागृती केल्या जात आहे. आॅनलाईनच्या माध्यमातून अनेक जण याच्याशी जुळतांना दिसून येत आहेत.
-महेश धोंगडे, वाशिम