महाराष्ट्र साहित्यिक ग्रुपच्या वतीने ऑनलाईन काव्य संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:43 AM2021-04-01T04:43:08+5:302021-04-01T04:43:08+5:30
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी स्मिता देशमुख होत्या. त्यांनी महाराष्ट्र सखी मंचच्या उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविक ज्येष्ठ मार्गदर्शक शुभदा पाटकर यांनी केले. ...
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी स्मिता देशमुख होत्या. त्यांनी महाराष्ट्र सखी मंचच्या उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविक ज्येष्ठ मार्गदर्शक शुभदा पाटकर यांनी केले. संचालन मीनाक्षी ढोले यांनी केले. महाराष्ट्र सखी मंचचे राहुल अनपट यांनी सहभागी कवयित्रींना सहभाग ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान केले. संमेलनाची तांत्रिक बाजू रूपाली जाधव यांनी सांभाळली. कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील तब्बल ४३ कवयित्रींनी आपल्या कविता सादर केल्या. बालकाव्य, गेय, अष्टाक्षरी, मुक्तछंद, देशभक्तीपर काव्य आणि अन्य काव्य प्रकारांचे कवयित्रींनी उत्तम सादरीकरण केले. स्मिता देशमुख आणि आलिया गोहर यांचे काव्य सगळ्यांना भावले. शशिकला गुंजाळ यांनी प्रत्यक्ष शेतातून आपल्या आई या भावस्पर्शी कवितेचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. यशस्वितेसाठी वनिता पाटील, दर्शना पाटील, हेमलता विसपुते, प्रियांका शेंडे यांच्यासह नियोजन मंडळातील सर्वांचे सहकार्य लाभले.