दुग्ध व्यवसायातील संधी विषयावर ऑनलाइन वेब संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:30 AM2021-06-02T04:30:35+5:302021-06-02T04:30:35+5:30

स्वागतानंतर उद्‌घाटनपर संबोधताना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर.एल. काळे यांनी जागतिक दूध दिवसाचे महत्त्व विशद ...

Online web dialogue on dairy business opportunities | दुग्ध व्यवसायातील संधी विषयावर ऑनलाइन वेब संवाद

दुग्ध व्यवसायातील संधी विषयावर ऑनलाइन वेब संवाद

Next

स्वागतानंतर उद्‌घाटनपर संबोधताना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. आर.एल. काळे यांनी जागतिक दूध दिवसाचे महत्त्व विशद करताना धवलक्रांतीचे प्रणेते डॉ. व्हर्गीस कुरियन यांना अभिवादन करून दैनंदिन आहारात दुधाचे महत्त्व विशद केले. जिल्हा पशुसंवर्धन उप-आयुक्त डॉ. बी.एस. बोरकर यांनी दुधाच्या आहारातील महत्त्व विषद केले. अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैधक व पशुविज्ञान संस्थाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल यु. भिकाने यांनी जागतिक दूध दिनाच्या औचित्याने महाराष्ट्रात २५६ ग्रॅम दरडोई उपलब्ध असून, मानकानुसार २८० ग्रॅम गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्वी दुग्ध उद्योजक व योगायोग शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मनोज जाधव हाेते. पशुपालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उकल मार्गदर्शकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.के. देशमुख व एस. आर. बावस्कर यांनी तर आभार डॉ. डी. एल. रामटेके यांनी मानले.

...........................

दुध व्यवसायासाठी चार सूत्री अवलंबवा

दुधाद्वारे प्राणीजन्य प्रथिनांचे महत्त्व व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधाची निर्यातकरिता उत्पादन व गुणवत्तावाढीवर भर देण्याचे सुचित केले. शाश्वत किफायतशीर दूध व्यवसायाकरिता उत्तम जनावरांची निवड, समतोल आहार, उत्कृष्ठ व्यवस्थापन व आरोग्याची काळजी असे चार सूत्र अवलंबवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: Online web dialogue on dairy business opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.