वाशिम जिल्ह्यात केवळ १० हजार क्विंटल कापूस खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:59 AM2020-05-21T10:59:57+5:302020-05-21T11:00:21+5:30
मार्च ते १९ मे या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात तीन केंद्रावर कापूस खरेदी संथ गतीने सुरू असल्याने मार्च ते १९ मे या कालावधीत केवळ १० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडे आणखी ७० टक्क्यांच्यावर कापूस पडून आहे; खरीप हंगाम आणि पावसाळा तोंडावर आल्याने कापूस खरेदीची गती वाढविणे आवश्यक ठरत आहे.
जिल्ह्यात कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, वाशिम या चार तालुक्यात बºयापैकी कापूस घेतला जातो. पांढºया सोन्याची बाजारपेठ म्हणून कधीकाळी कारंजाची ओळख होती. आताही जिल्ह्यात सर्वाधिक कापूस पीक हे कारंजा तालुक्यात घेतले जाते. कापूस खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात चार केंद्र आहे. त्यापैकी अनसिंग व मंगरूळपीर येथे सीसीआयकडून तर कारंजा व मानोरा येथे फेडरेशनकडून कापूस खरेदी केंद्र सुरू केले. अनसिंंग येथील कापूस खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. मंगरूळपीर येथील केंद्रावर सीसीआयकडून खरेदी सुरू आहे. या केंद्रावर मार्चपूर्वी ७० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. लॉकडाउनमध्ये केवळ सात हजाराच्या आसपास कापूस खरेदी झाली. मानोरा येथील केंद्रावर ५०२ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून केवळ १३९ क्विंटल कापूस खरेदी झाली. कारंजा येथील केंद्रावर अडीच हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. कापूस खरेदीची गती संथ असल्याने याचा फटका शेतकºयांना बसत आहे. ७० टक्के शेतकºयांकडे कापूस आहे. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकºयांना पैशाची गरज आहे. शेतकºयांच्या हातात पैसा आला, तरच खते, बियाणे व अन्य शेतीविषयक कामे सुरळीत होतील.
अनसिंग येथील केंद्राची पाहणी
अनसिंगच्या केंद्रावरील प्रेस मशीन दुरूस्त करण्यासंबंधी सीसीआय कापूस खरेदी केंद्राचे प्रमुख उमेश तायडे यांनी २० मे रोजी पाहणी केली. मशीन दुरूस्तीचा प्रश्न निकाली काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मानोरा येथे केवळ १३९ क्विंटल कापूस खरेदी
एक शेतकरी, एक टोकन, एक वाहन या प्रशासनाच्या यापूर्वीच्या धोरणामुळे कापूस खरेदीतील अडचणी शेतकº्यांसाठी डोकेदुखी ठरल्या. कापूस खरेदी करण्यासाठी विलंब होत आहे. या केंद्रावर केवळ १३९ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आल्याने दिरंगाईच्या धोरणाबाबत शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटला.