केवळ ११00 शेतक-यांनी उतरविला पीक विमा!
By admin | Published: January 14, 2017 01:27 AM2017-01-14T01:27:08+5:302017-01-14T01:27:08+5:30
वाशिम जिल्ह्यातील चित्र; कर्जदार शेतक-यांची संख्या ७९४
वाशिम, दि. १३- दरवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी हंगामातील पिकांचा विमा काढण्याबाबत जिल्ह्यातील शेतकर्यांमध्ये प्रचंड उदासीनता जाणवून आली. गतवर्षी तब्बल ९ हजार ३५५ शेतकर्यांनी रब्बी हंगामात पीक विमा काढला होता. ते प्रमाण यंदा अगदीच खालावले असून, १0 जानेवारी या अंतिम मुदतीपर्यंंत केवळ १,११२ शेतकर्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला.
ऐन रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच ८ नोव्हेंबर रोजी चलनातून ५00 आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय शासनस्तरावरून झाला. त्यामुळे खरीप हंगामातील शेतमाल विक्रीतून चालणार्या रोखीच्या व्यवहारांना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंंत ह्यब्रेकह्ण लागला होता. परिणामी, शेतकर्यांची आर्थिक घडी विस्कटली.
अशातच जिल्ह्यातील १.५ लाखांपेक्षा अधिक शेतकरी खातेदार असणार्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत जुन्या नोटा स्वीकारणे आणि नव्या नोटांचा ह्यविड्रॉलह्ण देण्यावर शासनाने बंधने लादल्यामुळे त्याचा थेट परिणाम शेतकर्यांच्या दैनंदिन व्यवहारांवर झाला. या बँकेत कर्जासाठी अर्ज करूनही अनेक दिवस शेतकर्यांना अपेक्षित कर्ज मिळाले नाही. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत (६,९९५) यावर्षी विविध बँकांतून कर्ज घेणार्या शेतकर्यांची संख्या केवळ १,१९३ आहे.
दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांचा विमा उतरविणार्या शेतकर्यांची संख्या देखील यंदा मोठय़ा प्रमाणात घटली असून, कर्ज घेणार्या ७९४ शेतकर्यांनी ३ लाख ९५ हजार रुपये विमा भरला असून, बिगर कर्जदार ३१८ शेतकर्यांनी ७७ हजार ८८१ रुपये विमा रक्कम अदा केल्याची माहिती अग्रणी बँकेकडून प्राप्त झाली.