वाशिम जिल्ह्यात केवळ २०० रुग्णालयांचीच नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:36 PM2021-01-07T12:36:42+5:302021-01-07T12:39:55+5:30

Hospital in Washim वाशिम जिल्ह्यात केवळ २०० खासगी रुग्णालयांनी नोंदणी केलेली आहे.

Only 200 hospitals are registered in Washim District | वाशिम जिल्ह्यात केवळ २०० रुग्णालयांचीच नोंदणी

वाशिम जिल्ह्यात केवळ २०० रुग्णालयांचीच नोंदणी

Next
ठळक मुद्देखासगी रूग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. सर्वाधिक नोंदणी ही वाशिम शहरातील रुग्णालयांची आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार खासगी रूग्णालयांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात केवळ २०० खासगी रुग्णालयांनी नोंदणी केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक नोंदणी ही वाशिम शहरातील रुग्णालयांची आहे. 
वैद्यकीय क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित डाॅक्टरांना खासगी रुग्णालय उभारण्यापूर्वी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार  आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीशिवाय खासगी रुग्णालय थाटता येत नाही. वाशिम शहरात जवळपास १२४ खासगी रुग्णालयांची नोंदणी झालेली आहे. अन्य तालुक्यात हे प्रमाण २० च्या आत आहे. वाशिमचा अपवाद वगळता अन्य तालुक्यात नोंदणीकृत खासगी रुग्णालयांचे प्रमाण कमी असल्याने आरोग्य विभागातर्फे पडताळणी मोहीम राबविणे गरजेचे ठरत आहे.


गेल्या वर्षात १८४ नोंदणी झाली 
सन २०१९ मध्ये जिल्ह्यात जवळपास १८४ खासगी रुग्णालयांची नोंदणी झाली होती. यामध्ये २०२० मध्ये १६ खासगी रुग्णालयांची भर पडली. शहरी भागात शक्यतोवर नोंदणी केल्यानंतरच खासगी रुग्णालय थाटले जाते. ग्रामीण भागात नोंदणी होते की नाही याची पडताळणी होणे गरजेचे आहे.


वैद्यकीय क्षेत्रातील पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर संबंधित डाॅक्टरांना खासगी रुग्णालय उभारण्यापूर्वी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. 
- डाॅ. मधुकर राठोड,  जिल्हा शल्य चिकित्सक वाशिम

Web Title: Only 200 hospitals are registered in Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.