वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप केवळ २७ टक्के!

By admin | Published: July 16, 2017 02:18 AM2017-07-16T02:18:56+5:302017-07-16T02:18:56+5:30

कर्जमाफीतील गुंतागुंतही कायम : बँकांना अद्याप स्पष्ट निर्देश नाहीत!

Only 27 percent of allocation of crop loan in Washim district! | वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप केवळ २७ टक्के!

वाशिम जिल्ह्यात पीक कर्ज वाटप केवळ २७ टक्के!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यंदाचा खरीप हंगाम शेतीसाठी सर्वार्थाने वेगळा राहिला असून, एरव्ही १ जुलैपर्यंंतच पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया संपत असताना यंदा मात्र १५ जुलैपर्यंंत केवळ २७ टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे. दुसरीकडे कर्जमाफीबाबतही बँकांना शासन स्तरावरून अद्याप स्पष्ट निर्देश नसल्याने अथवा यासंदर्भातील सकरुलर मिळाले नसल्याने कर्जमाफीस पात्र ठरू शकणारे शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.
गतवर्षीच्या खरीप हंगामात ९५0 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जुलै २0१६ पर्यंंत जिल्ह्यातील विविध बँकांनी शेतकर्‍यांना तब्बल ८९0 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले होते. यंदाच्या हंगामाकरिता ११५0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. त्यातुलनेत १५ जुलैपर्यंंत केवळ ३१0 कोटी रुपयांचे कर्ज वाटप होऊ शकले.
कर्ज वाटपाचे प्रमाण घटण्यामागील कारणांचा शोध घेतला असता, कर्जमाफी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील कर्ज अदा केले नाही. त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही. अशातच आता राज्य शासनाने सन २00९ पासूनच्या कर्जमाफीची घोषणा केली. तथापि, या निर्णयाची अंमलबजावणी होऊन थकबाकीदार शेतकर्‍यांचा सात-बारा कोरा झाल्यास ते नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरू शकतात; परंतु यासंदर्भातील अधिकृत घोषणापत्र जिल्ह्यातील एकाही बँकेला अद्याप प्राप्त झालेले नाही.
जिल्हा अग्रणी बँकेच्या माध्यमातून केवळ कर्जपुरवठा करणार्‍या बँकांना २00९ पासून थकीत असलेल्या शेतकर्‍यांच्या याद्या तयार करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कर्ज वाटपाच्या प्रक्रियेसोबतच कर्जमाफीसंदर्भातील गुंतागुंतही कायम असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Web Title: Only 27 percent of allocation of crop loan in Washim district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.