वाशिम जिल्ह्यात नाफेडकडून केवळ ८८०० क्लिंटल तुरीची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 14:15 IST2018-02-22T14:12:32+5:302018-02-22T14:15:25+5:30
वाशिम: जिल्ह्यात नाफेडच्यावतीने ५ फेब्रुवारीपासून शासकीय दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे; परंतु गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील सहाही केंद्र मिळून केवळ ८८३१ क्विंटल तुरीची खरेदी होऊ शकली आहे.

वाशिम जिल्ह्यात नाफेडकडून केवळ ८८०० क्लिंटल तुरीची खरेदी
वाशिम: जिल्ह्यात नाफेडच्यावतीने ५ फेब्रुवारीपासून शासकीय दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे; परंतु गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यातील सहाही केंद्र मिळून केवळ ८८३१ क्विंटल तुरीची खरेदी होऊ शकली आहे. शेतकºयांचा नाफेडला प्रतिसाद मिळत नसतानाच बाजार समित्यांमध्येही तुरीची आवक घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
वाशिम जिल्ह्यात नाफेडकडे तुरीची विक्री करण्यासाठी १९४०० हून अधिक शेतकºयांनी विविध खरेदी विक्री संस्थांकडे नोंद केली आहे. दीड महिना प्रतिक्षा केल्यानंतर अखेर १ फेब्रुवारी २०१७ पासून राज्यात नाफेडच्या तूर खरेदीला मुर्हूत मिळाला. तथापि, वाशिम जिल्ह्यात ही खरेदी ५ फेब्रुवारीपासून सुरू झाली. त्यातही सुरुवातीला वाशिम, रिसोड, मंगरुळपीर आणि कारंजा ही चार केंद्रच सुरू करण्यात आली होती. त्यामुळे मालेगाव आणि मानोºयातील शेतकरी वर्गात संतापाचे वातावरणही होते. अखेर आठवडाभरानंतर मालेगाव आणि मानोºयातही नाफेडकडून तूर खरेदी सुरू झाली. तथापि, जिल्ह्यातील नाफे ड तूर खरेदीच्या १५ दिवसांच्या कालावधित केवळ ९५६ शेतकºयांची ८८३१ क्विंटल तूर खरेदी होऊ शकली आहे. यंदा अल्प पावसामुळे उत्पादन घटल्याने आणि इतर पिकांना फ टका बसल्याने शेतकरी अडचणीत होते. त्यातच नाफेडकडे नोंदणी केली तरी, खरेदीला विलंब लागल्याने नोंदणी केलेल्या शेतकºयांनी अडचणीपोटी बाजारात व्यापाºयांकडेच कमी भावात तूर विकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.