७ दिवसांत केवळ ९०० जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:41 AM2021-01-23T04:41:20+5:302021-01-23T04:41:20+5:30

‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना कोरोना बाधितांवर उपचार करताना विषाणू संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ...

Only 900 people vaccinated in 7 days | ७ दिवसांत केवळ ९०० जणांचे लसीकरण

७ दिवसांत केवळ ९०० जणांचे लसीकरण

Next

‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना कोरोना बाधितांवर उपचार करताना विषाणू संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर आणि कारंजा येथील केंद्रांवर ‘फ्रंटलाइन वर्कर्स’ यांना ही लस दिली जात आहे. याअंतर्गत शासकीय आणि खासगी वैद्यकीय क्षेत्रातील एकूण ५ हजार ५५० कर्मचाऱ्यांची जिल्हा आरोग्य विभागाने नोंद केली होती. त्यातील केवळ ९०० जणांनीच आतापर्यंत ही लस घेतली असून तब्बल ४ हजार ६५० कर्मचाऱ्यांनी लस घेण्याबाबत तयारी दर्शविलेली नाही. दरम्यान, लस सुरक्षित असून घाबरण्याचे कुठलेच कारण नसल्याचे सांगत युद्धस्तरावर जनजागृती करण्यात येत आहे.

........................

बॉक्स :

दुसऱ्या टप्प्यात महसूलच्या कर्मचाऱ्यांना दिली जाणार लस

कोरोना विषाणू लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील ५ हजार ५५० कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात महसूल विभागांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली.

...................

लसीकरणाविषयी काय म्हणतात कर्मचारी?

कोरोना लसीविषयी सध्या सोशल मीडियातून काही नकारात्मक संदेश प्रसारित केले जात आहेत. असे संदेश अर्धवट माहितीच्या आधारे पाठवले जातात. कोरोनाची लस पूर्णत: सुरक्षित आहे, त्यामुळे कोणताही साईड इफेक्ट जाणवला नाही.

- डॉ. अविश दरेकार

आयुष अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय, कारंजा

.................

लसीकरणानंतर १५ ते १६ तासांनंतर अंगात काहीसा ताप जाणवला. लस टोचून घेतल्यानंतर अशी काही सौम्य लक्षणे दिसू शकतील, याची मला जाणीव होती. काही तासांनंतर ताप कमी झाला. त्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही.

- विद्या किसनराव भुसारे

परिचारिका, उपजिल्हा रुग्णालय, कारंजा

...................

वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्सेस तसेच इतर स्टाफने सोशल मीडियातून पसरविण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. त्यापेक्षा प्रत्यक्ष लस घेतलेले वरिष्ठ डॉक्टर, सहकाऱ्यांशी चर्चा करून संभ्रम दूर करावा. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी लस टोचून घेणे आवश्यक आहे. मीसुद्धा लस घेतली असून कुठलाही त्रास जाणवलेला नाही.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम

....................

६५००

जिल्ह्याला प्राप्त लसीचे डोस

९००

७ दिवसांत झालेला वापर

४५००

लसींचे शिल्लक डोस

३८७५

शासकीय वैद्यकीय कर्मचारी

१८१९

खासगी वैद्यकीय कर्मचारी

Web Title: Only 900 people vaccinated in 7 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.