मंगरुळपीरात आठवडाभरात आढळला एकमेव कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:39 AM2021-08-29T04:39:05+5:302021-08-29T04:39:05+5:30
दुसऱ्या लाटेत ३ ऑगस्ट २०२१ अखेर तब्बल ३४ हजार २३८ नवे रुग्ण निष्पन्न झाले ; तर ४८० जणांना संसर्गाची ...
दुसऱ्या लाटेत ३ ऑगस्ट २०२१ अखेर तब्बल ३४ हजार २३८ नवे रुग्ण निष्पन्न झाले ; तर ४८० जणांना संसर्गाची बाधा होऊन जीव गमवावा लागला. आता मात्र दिवसाला केवळ एक, दोनच कोरोना बाधित आढळून येत असून, जिल्हा कोरोनामुक्तीच्या अगदी निकट पोहोचल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
---------------------
ऑक्सिजनवर रुग्णच नाहीत
जिल्ह्यात दैनंदिन आढळत असलेले कोरोनाचे नवे रुग्ण, ॲक्टिव्ह रुग्ण, बरे झालेले आणि संसर्गाने आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांचा अहवाल जाहीर केला जातो. पोर्टलवरून घेतल्या जात असलेल्या या आकडेवारीत २७ ऑगस्ट अखेर ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा १० दर्शविण्यात आला आहे. त्यापैकी एकही रुग्ण ऑक्सिजनवर नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे.
००००००००००००००००००००
कोट : सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ १० कोरोना बाधित उपचाराखाली आहेत. रुग्णांना आता ऑक्सिजनवर ठेवण्याची गरजही भासत नसल्याने त्यांनाही लवकरच ‘डिस्चार्ज’ दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त शासकीय रुग्णालयांमध्ये कोविडने बाधित एकही रुग्ण उपचारार्थ भरती नाही.
- डाॅ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम