कर्जमाफीच्या आॅनलाईन अर्जासाठी केवळ पाच दिवस शिल्लक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 02:38 PM2018-03-26T14:38:40+5:302018-03-26T14:38:40+5:30
वाशिम - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पीककर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी वंचित शेतकºयांना ३१ मार्च २०१८ पर्यंत म्यान आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
वाशिम - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पीककर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी वंचित शेतकऱ्यांना ३१ मार्च २०१८ पर्यंत म्यान आॅनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. अर्जासाठी केवळ पाच दिवस शिल्लक असून, कर्जदार शेतकऱ्यांनी आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सोमवारी केले.
जून २०१७ मध्ये कर्जमाफीच्या मुद्यावरून विविध संघटना तसेच शेतकऱ्यां नी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने सुकाणू समिती व शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करीत कर्जमाफी जाहीर केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयांची मर्यादा घालून २४ जुलै ते २२ सप्टेंबर २०१७ या दरम्यान कर्जमाफी योजनेची आॅनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली होती. तथापि, या योजनेसाठी अर्ज दाखल करावयाच्या विहित कालावधीत अनेक शेतकऱ्यांना काही वैयक्तिक व तांत्रिक कारणांमुळे आॅनलाईन अर्ज सादर करता आले नाहीत. याची दखल घेत राज्य शासनाने १ ते ३१ मार्च २०१८ अशी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली. यापूर्वी ज्या शेतकऱ्यां नी किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कुणीही अर्ज केलेला नाही, अशा अर्ज करण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ३१ मार्च २०१८ पर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे. वाशिम जिल्ह्यात २४ जुलै ते २२ सप्टेंबर २०१७ या दरम्यान एकूण २ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज नोंदणी केली होती. छानणी व पडताळणीअंती जिल्ह्यातील एक लाख ६४ हजार ५३४ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. जवळपास ९५ हजार शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणीनंतर अर्ज सादर केले नव्हते. आता ३१ मार्चपर्यंत उपरोक्त शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहेत. २५ मार्चपर्यंत जवळपास ३२ हजार शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर केले, असा अंदाज उपनिबंधक कार्यालयाने वर्तविला. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०१८ पूर्वी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कटके यांनी केले.