मालेगावात आढळले केवळ चार बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:30 AM2021-06-06T04:30:24+5:302021-06-06T04:30:24+5:30
................ दुपारी २ नंतर रस्त्यावर शुकशुकाट वाशिम : आठवड्यातील शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ...
................
दुपारी २ नंतर रस्त्यावर शुकशुकाट
वाशिम : आठवड्यातील शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्याचे पालन होत असून दुपारी २ वाजेनंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे.
...............
पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी
वाशिम : पोस्ट ऑफीस ते पुसद नाका यादरम्यानच्या रस्त्यावर अनेक दवाखाने आहेत. त्या भागातील रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी संदीप काळे यांनी न.प.कडे शुक्रवारी केली.
.............
मानोरा शहरात एकही रुग्ण नाही
वाशिम : शनिवारी आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील मानोरा शहरात कोरोनाने बाधित एकही रुग्ण आढळला नाही. ग्रामीण भागातही केवळ भोयणी, कारखेडा, माहुली, सोयजना, धामणी आणि रतनवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
.................
मुबलक पाण्यामुळे टंचाईपासून मुक्ती
वाशिम : गतवर्षी झालेल्या समाधानकारक पर्जन्यमानामुळे चालू वर्षी जलस्रोताची पातळी कमी झाली नाही. यामुळे तालुक्यातील अनेक गावांना यंदा पाणीटंचाईपासून मुक्ती मिळाल्याचे दिसून येत आहे.