९१ गावाच्या सुरक्षेसाठी मानोरा पोलिसाकडे एकच गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 02:54 PM2019-07-13T14:54:22+5:302019-07-13T14:55:23+5:30
मानोरा : ९१ गाव पर्यंत पोचण्यासाठी मानोरा पोलिसाच्या ताफ्यात एकच वाहन आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : ९१ गाव पर्यंत पोचण्यासाठी मानोरापोलिसाच्या ताफ्यात एकच वाहन आहे. एकाच वेळेस अनेक घटना तालुक्यात घडतात, त्यापर्यतं पोहचण्यासाठी पोलिसाची चांगलीच तारांबळ उडते किंवा पोलिसांना दुचाकीचा मार्ग अवलंबा लागतो.
मानोरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ९१ गावे येतात, ती गावे पाच बिटजमध्ये विखुरली गेली आहे. ८१ गावाच्या सुरक्षेसोबत अनेक घडामोडी सुध्दा घडत असतात. त्यामध्ये सन उत्सव, विविध मागण्यासाठी आंदोलने नेहमीच सुरु असतात. या शिवाय तालुक्यात विविध घटना दैनंदीन आहे. त्या प्रकरणाचा निपटारा, किंवा आरोपीच्या गळ्यापर्यंत हात पोचविण्यासाठी एकच वाहन असल्यामुळे ऐकाच वेळेस इतर ठिकाणी जाण्यास तारांबळ उडते. पोलिस निरीक्षकांना अनेकदा बैठकीसाठी वाशिमला जावे लागते. कोणत्याही कामासाठी गाडी वाशिमला गेल्याने इतर ठिकाणी जाण्यास चांगली पंचाईत होते. पोलिस निरीक्षकाच्या नंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक ,पोलिस उपनिरीक्षक चा पोस्टींग आहेत. अधिकाऱ्याचा दरारा घटनेपर्यंत गाडीने गेल्यानेच अवलंबुन असतो. अनेक गावामध्ये अवैध दारुसोबत जुगार मोठ्या प्रमाणात चालु असता. पोलिसांनी कितीही कारवाई केली तर परत दुसºया दिवशी व्यवस्था जैसे असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी हाणामारी च्या घटना घडतात, अशा घटनांना आवर घालण्यासाठी व अधिकाऱ्यांना घटनेपर्यंत पोहोचविण्यासाठी मानोरा पोलिसांच्या ताब्यात एका वाहनाची गरज आहे अशी मागणी नागरिकांतुन सुध्दा होत आहे. तसेच याकडे पोलीस अधीक्षकांनी लक्ष पुरवून येथील वाहनाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी होत आहे.