नव्याने आढळले केवळ सात कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:29 AM2021-06-25T04:29:01+5:302021-06-25T04:29:01+5:30
जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण एप्रिल २०२० या महिन्यात आढळला होता. फेब्रुवारी २०२१ पर्यंत कायम राहिलेल्या पहिल्या लाटेत ...
जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित पहिला रुग्ण एप्रिल २०२० या महिन्यात आढळला होता. फेब्रुवारी २०२१ पर्यंत कायम राहिलेल्या पहिल्या लाटेत एकूण रुग्णांचा आकडा ७ हजार ४३० वर पोहोचला. त्यानंतर आलेली संसर्गाची दुसरी लाट मात्र तुलनेने अति तीव्र स्वरूपाची ठरली. मे अखेरपर्यंत रुग्णवाढीचा आलेख सतत उंचावत राहिला; तर २४ जूनअखेर एकूण रुग्णांचा आकडा ४१ हजार ३१५ झाला आहे. असे असले तरी १ जूनपासून सातत्याने रुग्णसंख्या कमी होत चालली असून, गुरुवारी करण्यात आलेल्या एकूण १५८० चाचण्यांपैकी केवळ ७ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.
.................
दोन तालुके निरंक
कोरोनाविषयक स्थितीसंदर्भात गुरुवारचा दिवस जिल्ह्यासाठी अत्यंत समाधानकारक ठरला. आज रिसोड आणि मानोरा या दोन तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण निष्पन्न झालेला नाही; तर मालेगाव, मंगरूळपीर आणि कारंजा या तीन तालुक्यांमध्ये नव्याने प्रत्येकी केवळ एक रुग्ण आढळला. वाशिम तालुक्यात शहरात तीन व साखरा येथे एका रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला.
.................
कोरोनाबाधितांची सद्य:स्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४१३१५
ॲक्टिव्ह – २८४
डिस्चार्ज – ४०४१५
मृत्यू – ६१५