शेततळय़ांची केवळ सहा टक्के उद्दिष्टपूर्ती!
By admin | Published: January 1, 2017 01:18 AM2017-01-01T01:18:51+5:302017-01-01T01:18:51+5:30
कृषी विभागाची उदासीनता; ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अपयशी.
वाशिम, दि. ३१- फेब्रुवारी २0१६ मध्ये शासनस्तरावरून मंजूर झालेली ह्यमागेल त्याला शेततळेह्ण ही योजना तांत्रिक अडचणींमुळे थंडावली आहे. एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांत जिल्हय़ात १९00 शेततळे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना ३१ डिसेंबरअखेर कृषी विभागाला त्यापैकी केवळ ११८ शेततळे (६ टक्के) पूर्ण करण्यात यश मिळाले आहे.
'मागेल त्याला शेततळे', असे गोंडस नाव देऊन शासनाने हाती घेतलेल्या ह्यमागेल त्याला शेततळेह्ण या योजनेतील जाचक व किचकट अटींमुळे जिल्हय़ातील शेतकर्यांनी योजनेकडे बहुतांशी पाठ फिरवली आहे. जिल्हय़ात या योजनेची एप्रिल २0१६ या महिन्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. याअंतर्गत कृषी विभागाला १९00 शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र प्रारंभीच्या काळात कृषी विभागाच्या थंडावलेल्या धोरणांमुळे शेतकर्यांना योजनेसंबंधीची पुरेशी माहितीच मिळाली नाही. यासह जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात बराच वेळ निघून गेला. त्यानंतर पावसाळ्यामुळे तीन महिने शेततळ्यांची कामेच होऊ शकली नाहीत.
परिणामी, नोव्हेंबर २0१६ अखेर योजनेंतर्गत केवळ ३२ शेततळ्यांची कामे पूर्ण होऊ शकली. डिसेंबरमध्ये मात्र प्रशासनाने या योजनेला गती देऊन ८६ शेततळ्यांची कामे पूर्ण करून घेतली आहेत. असे असले तरी आगामी तीन महिन्यांत उर्वरित १,७८२ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनाला पेलावे लागणार आहे.