"गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार"साठी केवळ दोन प्रस्ताव !
By Admin | Published: May 24, 2017 07:30 PM2017-05-24T19:30:43+5:302017-05-24T19:30:43+5:30
रिसोड : "गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार" योजनेअंतर्गत रिसोड तालुक्यातून २३ मे पर्यंत केवळ दोन प्रस्ताव सादर झाले आहेत.
रिसोड : "गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार" योजनेअंतर्गत रिसोड तालुक्यातून २३ मे पर्यंत केवळ दोन प्रस्ताव सादर झाले आहेत.
राज्यातील धरणे व जलसाठ्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ व्हावी या दृष्टीने धरणातील गाळ काढुन गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासनाने सुरु केली आहे. धरण किंवा तलावातील उपसा करण्यात आलेला गाळ वाहून नेण्यासाठी शेतकरी व अशासकीय संस्थांबरोबरच ग्रामपंचायतींनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे. तसेच ० ते १०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या धरण, तलावातील गाळ उपसा करण्यासाठी लागणारी मशीन व त्याच्या इंधनाचा खर्च संबंधितांना शासनाकडून तसेच सीएसआरमधून दिला जाणार आहे. हा गाळ स्वखर्चाने वाहून नेण्यासाठी तयार असल्याचे अर्ज स्थानिक शेतकरी अथवा अशासकीय संस्था, ग्रामपंचायतींनी तहसीलदारांकडे सादर करणे आवश्यक आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, ग्रामपंचायतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा व तालुकास्तरीय यंत्रणेकडून करण्यात आले होते. अद्यापपर्यंत केवळ दोन ठिकाणचे प्रस्ताव प्राप्त झाले असून, यामध्ये कुऱ्हा व नावली या गावाचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार राजू सुरडकर यांनी दिली.