उघड्यावर शौचास; कारवाई गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:28 AM2021-07-20T04:28:23+5:302021-07-20T04:28:23+5:30
वाशिम : घरी शौचालय असूनही अनेक जण उघड्यावर शौचास जात असल्याने मध्यंतरी गुड मॉर्निंग पथकाने कारवाईची मोहीम राबविली. दरम्यान, ...
वाशिम : घरी शौचालय असूनही अनेक जण उघड्यावर शौचास जात असल्याने मध्यंतरी गुड मॉर्निंग पथकाने कारवाईची मोहीम राबविली. दरम्यान, गत दोन महिन्यांपासून गुड मॉर्निंग पथक सक्रिय नसल्याने पुन्हा उघड्यावर शौचवारी सुरू झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत (ग्रामीण) जिल्ह्यात १ लाख ७५ हजारांवर शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून, जिल्हा हागणदारीमुक्त घोषित झालेला आहे; परंतु अनेक गावांत परिस्थिती जैसे थे झाली. घरी शौचालय असूनही त्याचा नियमित वापर होत नाही. हागणदारीमुक्त झालेल्या अनेक गावांत उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे २२ मार्चपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही गुड मॉर्निंग पथकातर्फे गावोगावी भेटी देऊन उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना समज देण्यात आली. मे महिन्यापर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर मात्र मोहिमेत शिथिलता आल्याचे दिसून येते. आता तर ग्रामीण भागातून गुड मॉर्निंग पथकही गायब झाले आहे. ग्रामीण भागात पुन्हा गुड मॉर्निंग पथक सक्रिय करण्याची मागणी होत आहे.