उघड्यावर शौचास जाणे पडले महागात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 01:43 AM2017-08-26T01:43:02+5:302017-08-26T01:43:22+5:30
मंगरूळपीर: तालुक्यातील पाच गावातील उघड्यावर शौचास जाणार्या २२ जणांना २५ ऑगस्ट रोजी भरारी पथकाने पकडून मुंबई पोलीस अधिनियमानुसार १२00 रुपये दंड वसूल करण्याची कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: तालुक्यातील पाच गावातील उघड्यावर शौचास जाणार्या २२ जणांना २५ ऑगस्ट रोजी भरारी पथकाने पकडून मुंबई पोलीस अधिनियमानुसार १२00 रुपये दंड वसूल करण्याची कारवाई केली.
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत गुड मॉर्निंग पथकाच्या भरारी पथकाने शुक्रवारी तालुक्यात धाडी टाकल्या. हिसई, जांब, आजगाव, मोहगव्हाण, चांभई बालदेव येथील २२ व्यक्तींकडून प्रत्येकी १,२00 रुपये दंड भरून घेण्यात आला. यापैकी ५ व्यक्तींनी ऑन दि स्पॉट दंड भरला. उर्वरित १७ लोकांना मंगरुळपीर पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी प्रत्येकी १,२00 रुपये भरून त्यांची सुटका केली. या कारवाईत मोहगव्हाण ग्राम पंचायत सदस्यांना पकडून जागेवर बाराशे रुपये दंड वसूल केला. ही कारवाई स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने केली. वाशिम जिल्ह्यात संकल्प स्वच्छतेचा स्वच्छ महाराष्ट्राचा या उपक्रमाला गती देण्यासाठी जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व तसेच जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या गुड मॉर्निंग पथकामध्ये स्वच्छ भारत मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राजू सरतापे, माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार राम शृंगारे, अभियंता अमित घुले, पं. स. चे मिनी बीडीओ भिकाजी पद्मणे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष राजू ठाकरे, पंडित राठोड, विष्णू सावके, म्हातारमारे, व्यवहारे, शिंदे, निवाने, विजय वानखेडे, ठाकरे पाटील, गांजरे, अभय तायडे, ज्ञानेश्वर महल्ले, धडक कृती दलाच्या अनिता सहस्रबुद्धे, रणबावळे, ितखे, बगळे आदींनी सहभाग घेतला होता.