पैनगंगेवरील बॅरेजचे दरवाजे उघडले!

By admin | Published: August 2, 2016 11:51 PM2016-08-02T23:51:44+5:302016-08-02T23:51:44+5:30

वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस जास्त; लघू प्रकल्प तुडूंब भरले.

Opening of barge doors on penganga! | पैनगंगेवरील बॅरेजचे दरवाजे उघडले!

पैनगंगेवरील बॅरेजचे दरवाजे उघडले!

Next

वाशिम : गत चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाची संततधार असून, आतापर्यंंत सरासरीपेक्षा ४७ टक्के पाऊस जास्त झाल्याची नोंद आहे. दरम्यान, संततधार पावसामुळे जिल्ह्या तील लघु प्रकल्प तुडूंब भरले असून, पैनगंगा नदीवरील बॅरेजचे मंगळवारी दरवाजे उघडण्यात आले.
गत चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने जलपातळीत कमालीची वाढ केली आहे. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस सुरू होता. या पावसामुळे पैनगंगेवरील अडगाव, गणेशपूर, कोकलगाव, ढिल्ली, उकळी, जूमडा, राजगाव, टणका, जयपूर व सोनगव्हाण बॅरेज तुडूंब भरले असून, संभाव्य हाणी टाळण्यासाठी, खबरदारी म्हणून या बॅरेजेसचे सर्व दरवाजे मंगळवारी उघडले. रबी हंगामात शेकडो हेक्टर जमिन सिंचनाखाली येण्याच्या शे तकर्‍यांच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, बॅरेज परिसरात नागरिकांनी येऊ नये, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. एकबुर्जी या मध्यम प्रकल्पासह एकूण ३३ प्रकल्प मंगळवारी ओव्हर फ्लो झाले. जिल्ह्यात सर्व तालुक्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.

Web Title: Opening of barge doors on penganga!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.