मंदिरे खुले करून, गुरव समाजाला आर्थिक मदतीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:34+5:302021-07-22T04:25:34+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मागील दोन वर्षांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरात पूजाअर्चा करणाऱ्या गुरव ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मागील दोन वर्षांपासून राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरात पूजाअर्चा करणाऱ्या गुरव समाजाचे उत्पन्न बंद झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याचवेळी मंदिराच्या पूजेचा व देखभालीचा खर्च कायमच आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुजाऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून गुरव समाजाला थेट आर्थिक मदत करावी, तसेच पुजार्यांचा फ्रंटलाइन योद्ध्यांमध्ये समावेश करून त्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. दरम्यान, अखिल गुरव समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर माळेकर यांनी उपस्थित समाजबांधवांना संबोधित केले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी साधना तळणीकर, निखिल खंडाळकर, बालाजी इथापे, गोपाल डिंडाळकर, अनिल बोरकर, संजय विटकरे, लता बोरकर, अनंता बोरकर, माधव विटकरे, स्वाती विटकरे आदींची उपस्थिती होती.