जनतेतून सरपंच निवडीला विरोध

By admin | Published: July 17, 2017 02:37 AM2017-07-17T02:37:22+5:302017-07-17T02:37:22+5:30

माजी सरपंच-उपसरपंच बैठकीत ‘सरपंच निवड प्रक्रिये’वर मंथन

Opposition to select the sarpanch from the people | जनतेतून सरपंच निवडीला विरोध

जनतेतून सरपंच निवडीला विरोध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: थेट जनतेतून सरपंच निवड होण्याबाबतचा सरकारचा निर्णय हा अतिशय चुकीचा व घातक असून, धनदांडग्यांना पुढे रेटण्याचा व दुबळ्यांना मागे हटविण्याचाच कुटील डाव म्हटला पाहिजे, असे मत आमदलचे प्रमुख गंगाधर कांबळे यांनी वाशिम येथील माजी सरपंच-उपसरपंच बैठकीमध्ये व्यक्त केले.
१६ जुलै रोजी वाशिम येथील विश्रामगृहात माजी सरपंच- उपसरपंच यांची जिल्हास्तरीय बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव खडसे तर प्रमुख अतिथी म्हणून दारिद्र्यनिर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष रमेश भलेराव, आमदल प्रवक्ता रवींद्र इंगोले, पं.स. सदस्य जनार्दन सोनुने, नारायण आव्हाळे, मधुकर इंगोले, डिगांबर काळे यांची उपस्थिती होती. यावेळी मोबीसिंग राठोड, भारत पाटील, रवी खंडारे, डॉ. पौळकर, रामकिसन वाघमारे, श्रावण काबळे, सहभागी होते. गंगाधर कांबळे म्हणाले की, सरपंच निवडीच्या निर्णयामुळे बलवान मंडळींना आनंदाच्या उकळया फुटत असल्या तरी सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी मात्र हा निर्णय क्लेशदायक ठरणारा आहे, असे भाकित त्यांनी वर्तविले. या निवड प्रक्रियेला विरोध व जनजागृती करण्यासंदर्भात आंदोलन तीव्र केले जाणार आहे. यासाठी आमदलद्वारा ११ कलमी कार्यक्रम घेऊन सहा जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे, असे कांबळे म्हणाले. थेट जनतेतून होणार असलेली सरपंच निवड ही सामान्य व गोरगरीब जनतेसाठी घातक असल्यामुळे ती रद्द करण्यात यावी यासाठी प्रखर संघर्ष उभा करणे, माजी सरपंच उपसपरंच यांना दरमहा ३ हजार रुपये निवृत्तीवेतन व सन्मानधन मिळण्यासाठी आग्रह धरणे व विद्यमान ग्रा.पं. सदस्याला अधिकार प्राप्त होण्यासाठी संघर्षाची भूमिका घेणे हे चार ठराव या बैठकीत पारित करण्यात आले. संचालन व आभार दीपक भालेराव यांनी केले.

Web Title: Opposition to select the sarpanch from the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.