वाशिम  जिल्हा कारागृहात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 02:31 PM2017-11-17T14:31:27+5:302017-11-17T14:33:39+5:30

वाशिम - राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा कारागृहात गुरूवारी जिल्हा कारागृहात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व तंबाखु नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बंदी व कैद्यांची तपासणी करण्यात आली.

Oral Health Check-up Camp in Washim District Jail! | वाशिम  जिल्हा कारागृहात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर !

वाशिम  जिल्हा कारागृहात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर !

Next
ठळक मुद्देतंबाखू नियंत्रण कार्यक्रम तंबाखूजन्य पदार्थाच्या  दुष्परिणामाबाबत जनजागृती 


वाशिम - राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जिल्हा कारागृहात गुरूवारी जिल्हा कारागृहात मौखिक आरोग्य तपासणी शिबिर व तंबाखु नियंत्रण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बंदी व कैद्यांची तपासणी करण्यात आली.
राष्ट्रीय तंबाखून कार्यक्रम कक्ष व राष्ट्रीय मौखीक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयाचेजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.ए.ए.राऊत, अतिरिक्त  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जे.एम. जांभरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली  पार पडलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा कारागृह अधिक्षक  आर. एस. चांदणे, प्रमुख पाहुणे म्हणून तुरूंग अधिकारी एस. एस. हिरेकर, ए.व्ही. वानखेडे, ए.एस. पंडीत आदी   उपस्थित होते. कार्यक्रमाचे समुपदेशन राम सरकटे म्हणाले की, तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यावर कुठे तरी प्रतिबंध बसावा व कर्करोगाचे  प्रमाण कमी व्हावे याकरिता तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन टाळावे, असे आवाहन केले. तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. सामान्य रूग्णालयाचे दंत चिकित्सक डॉ.एम.व्ही.वराडे यांनी कैदी व बंद्यांची मौखीक आरोग्य तपासणी केली. सामान्य रुग्णालयाचे सामाजिक कार्यकर्ता रामकृष्ण धाडवे यांनी तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या  व्यसनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सिगारेट व तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंध अधिनियम २००३ याबद्दल माहिती दिली. जिल्हा कारागृहाचे अधिक्षक आर. एस. चांदणे यांनी तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या  दुष्परिणामाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करावी व कर्करोगाच्या वाढत्या प्रमाणाला आळा बसावा याबाबत लोकांमध्ये जाणिवजागृती व्हावी याकरिता आरोग्य विभागाचा हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे, असे  सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा कारागृहाचे  अधिकारी रणजीत पवार, सुभेदार श्रीराम माल्टे, पोलीस कर्मचारी सुभाष आठवले, मुरलीधर ठाकरे व कर्मचाºयांचे सहकार्य लाभले.

Web Title: Oral Health Check-up Camp in Washim District Jail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.