तोरणाळा येथील २० एकर क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 03:43 PM2019-06-25T15:43:25+5:302019-06-25T15:43:31+5:30
५ शेतकºयांच्या मिळून २० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: सिंचन विहिरी आटल्या असतानाच रखरखत्या उन्हाचा परिणाम झाल्याने तब्बल ५ शेतकºयांच्या मिळून २० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागा सुकल्या आहेत. त्यामुळे या शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाशिम तालुक्यातील तोरणाळा येथे हा प्रकार पाहायला मिळत आहे.
गतवर्षीच्या समाधानकारक पावसानंतरही वाढलेल्या उष्णतामानामुळे जिल्ह्यातील ९० टक्के विहिरींनी हिवाळ्याच्या अखेरपासूनच तळ गाठला. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम झालाच शिवाय फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात तोरणाळा येथील ५ शेतकºयांच्या मिळून २० एकर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रातील संत्रा बागेतील शेकडो झाडे रखरखत्या उन्हामुळे पूर्णपणे सुकली आहेत. आता ही झाडे तोडून सरपण करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात परसरात विठोबा गोटे, मंगेश रामचंद्र मगर, त्र्यंबक तुकाराम मुठाळ, रामदास ज्ञानबा मुठाळ, गणपत रामजी चौधरी आदि शेतकºयांचा समावेश आहे. दरम्यान, यंदाच्या उन्हाळ्यात वाशिम तालुक्यासह मानोरा, मंगरुळपीर आणि मालेगाव तालुक्यातील काही शेतकºयांच्या संत्रा बागा सुकल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
जिल्हाधिकाºयांकडे मदतीची मागणी
रखरखत्या उन्हामुळे संत्रा बागा सुकल्याने तोरणाळा येथील पाचही शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आता त्यांच्या संत्रा बागातून उत्पादनाची आशाही राहिली नाही. त्यामुळे हताश झालेल्या या शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे २५ जुन रोजी निवेदन सादर करून आपली व्यथा मांडत सुकलेल्या बागांची पाहणी करण्यासह शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी केली आहे.