दुष्काळी परिस्थितीतही फुलविली संत्रा बाग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 12:50 PM2019-05-05T12:50:36+5:302019-05-05T12:50:45+5:30
राजुरा: पाच किमी अंतरावरून पाणी आणत राजूरा येथील उपक्रमशील शेतकºयाने दुष्काळी परिस्थितीतही संत्रा बाग फुलविली आहे.
- यशवंत हिवराळे
राजुरा: पाच किमी अंतरावरून पाणी आणत राजूरा येथील उपक्रमशील शेतकºयाने दुष्काळी परिस्थितीतही संत्रा बाग फुलविली आहे. याबरोबरच फळबाग, भाजीपाला उत्पादन घेऊन त्यांनी इतर शेतकºयांसमोर आदर्श निर्माण केला आहे. शिवाजी सोनोने असे या उपक्रमशील शेतकºयाचे नाव आहे.
मालेगाव तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीच गाव असलेल्या राजूरा येथे नेहमीच पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन घेता येत नाही. खरिपाचे पीक घेतल्यानंतर पाण्याअभावी अनेक शेतकºयांची जमिन विनापेरणी तशीच पडून राहते तर काही उपक्रमशील शेतकरी वेगळ्या पद्धतीची शेती करून भरघोष उत्पन्न घेत असल्याचेही आशावादी चित्र आहे. यामध्ये शिवाजी महादजी सोनोने यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शिक्षण शास्त्र पदवी घेतलेल्या सोनोने यांनी काही काळासाठी विनाअनुदानित शाळेवर नोकरी सुध्दा केली. मात्र वडीलोपार्जीत शेती व्यवसायाशी कुटूंबाची जुळलेली नाळ व त्यातुन मातीशी जुळलेला नळा त्यांना शेती व्यवसायाकडे घेवुन गेला. त्यांनी नोकरीचा राजीनामा देत शेतीमध्येच करीअर करण्याची खुनगाठ बांधुन स्वत:ला शेती व्यवसायात झोकुन दिले. सुरुवातीच्या काळात त्यांनी आधुनिक पध्दतीने काशीफळ, आलु, हळद, कांदा इत्यादी पिकांचे विक्रमी उत्पादन घेवुन परिसरातील शेतकºयांसाठी एक आदर्श निर्माण केला. जवळपास ३५ वर्षापासुन ते संत्रा उत्पादन घेत आहेत. चार एकर क्षेत्रफळावर त्यांनी ७०० पेक्षा अधिक संत्रा झाडाची जोपासना केली आहे. अलिकडच्या काळात पाणीटंचाई जाणवत असल्याने त्यांनी पाच किमी अंतरावरील चाकातिर्थ संग्राहक तलावावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणले आहे. यावर्षी भीषण पाणीटंचाई असतानाही सोनोने यांनी संत्रा बाग फुलविली आहे. चालु वर्षी त्यांनी या बागेतुन जवळपास तीस टनावर संत्रा फळाचे उत्पादन घेतले असुन त्यापासुन सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे ते म्हणाले.