पश्चिम वऱ्हाडातील संत्रा अडकला परराज्यातील ‘कोल्ड स्टोअरेज’मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:20 AM2020-04-17T11:20:58+5:302020-04-17T11:21:30+5:30

अनेक संत्रा बागायतदारांनी हैदराबाद येथील कोल्ड हाऊसमध्ये संत्रा ठेवलेला आहे.

Orange from vidarbha stuck in the 'cold storage' of the other state | पश्चिम वऱ्हाडातील संत्रा अडकला परराज्यातील ‘कोल्ड स्टोअरेज’मध्ये

पश्चिम वऱ्हाडातील संत्रा अडकला परराज्यातील ‘कोल्ड स्टोअरेज’मध्ये

Next

वाशिम : पश्चिम वºहाडात बऱ्यापैकी संत्रा फळबाग आहे; त्या तुलनेत कोल्ड हाऊसची सुविधा उपलब्ध नाही. संत्र्याला चांगला भाव मिळावा म्हणून पश्चिम वºहाडातील अनेक शेतकरी परराज्यातील कोल्ड स्टोअरेजमध्ये संत्रा ठेवतात. याहीवर्षी अनेक संत्रा बागायतदारांनी हैदराबाद येथील कोल्ड हाऊसमध्ये संत्रा ठेवलेला आहे. कोरोना विषाणूमुळे परराज्याच्या सीमा बंद असल्याने पश्चिम वºहाडातील शेतकऱ्यांना परराज्यातून संत्रा आणणे कठीण झाले आहे. परिणामी, शेतकºयांची चिंता वाढली आहे.
शेतीला आधुनिकतेची जोड देत पश्चिम वºहाडातील अनेक शेतकरी फळबागेकडे वळले आहेत. अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यात १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर संत्रा फळबाग असून या माध्यमातून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकºयांकडून होत आहे. पश्चिम वºहाडात संत्र्यासाठी महत्वाची बाजारपेठ उपलब्ध नसल्याने अपेक्षीत बाजारभाव मिळत नाही, अशी खंत वाशिम जिल्ह्यातील मुंगळा येथील संत्रा उत्पादक महादेव राऊत यांनी व्यक्त केली. अपेक्षीत बाजारभाव येईपर्यंत संत्र्याची साठवणूक करण्यासाठी पश्चिम वºहाडात कोल्ड स्टोअरेज हाऊसची सुविधा पुरेशा प्रमाणात नाही. परिणामी, शेतकरी हैद्राबाद येथील कोल्ड स्टोअरेजला पसंती देतात.

पश्चिम वºहाडातील जवळपास ६० ते ७० शेतकºयांनी हैद्राबाद येथील कोल्ड स्टोअरेजमध्ये संत्र्याची साठवणूक केली. परंतू, त्यानंतर कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परराज्याच्या तसेच जिल्ह्याच्या सीमा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या. त्यामुळे शेतकºयांचा संत्रा हैद्राबाद येथे अडकून पडला आहे. संत्रा खराब तर होणार नाही या भीतीने शेतकºयांची झोप उडाली आहे. संत्रा आणण्याकरीता शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी संत्रा उत्पादक महादेव राऊत, लक्ष्मण राऊत, अशोक केळे, गजानन केळे, पांडुरंग राऊत, नंदू केळे आदींनी १६ एप्रिल रोजी केली.

Web Title: Orange from vidarbha stuck in the 'cold storage' of the other state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.