युवा सप्ताहांतर्गत उद्या वक्तृत्व स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:44 AM2021-01-13T05:44:10+5:302021-01-13T05:44:10+5:30
मालेगाव : युवा सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर १४ जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही ...
मालेगाव : युवा सप्ताहानिमित्त जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयीन स्तरावर १४ जानेवारी रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही बळकटीमध्ये माझी भूमिका, इतिहास माझा मार्गदर्शक, ई-गव्हर्नन्स उपयुक्तता, शेती देशाचा आर्थिक कणा, साहित्य समाजाचे दिशादर्शक, स्वच्छता हे मिशन नसून अंगिकारावयाची वृत्ती, स्त्रीशक्ती ही आदिशक्ती हे स्पर्धेचे विषय आहेत.
००००
मास्कप्रकरणी ४२ चालकांवर कारवाई
रिसोड : वाहन चालविताना मास्कचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या असतानाही अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रिसोड पोलिसांनी १२ जानेवारी रोजी कारवाईची मोहीम राबवत मास्कचा वापर न करणाऱ्या जवळपास ४२ चालकांवर दंडात्मक कारवाई केली.
०००
दुष्काळी सवलतींचा लाभ देण्याची मागणी !
रिसोड : रिसोड तालुक्यातील १०० गावांची खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ४४ पैसे आल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी सवलतींचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी पंजाबराव अवचार, सोनुबाबा सरनाईक यांनी १२ जानेवारी रोजी तालुका प्रशासनामार्फत शासनाकडे केली.
०००००
संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी
मेडशी : येथील पोलीस पथकाने ११ व १२ जानेवारी रोजी मेडशी जिल्हा परिषद गटातील संवेदनशील मतदान केंद्रांची पाहणी केली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही पोलीस प्रशासनाने मंगळवारी केले.
००००
तिसऱ्या टप्प्यातील घरकुल अनुदान रखडले
शिरपूर जैन : रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकाम पूर्ण करणाऱ्या परिसरातील जवळपास ४२ लाभार्थींना तिसऱ्या टप्प्यातील अनुदान अद्याप मिळाले नाही. शासनाकडून निधी प्राप्त झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.