रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड संथगतीने  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 12:21 PM2020-12-13T12:21:22+5:302020-12-13T12:21:30+5:30

Washim News आतापर्यंत केवळ ३७४ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.

Orchard cultivation under Employment Guarantee Scheme slow | रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड संथगतीने  

रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड संथगतीने  

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०२०-२१ या वर्षात ४७५ गावांतील १७२० हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत केवळ ३७४ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे.
शेतीच्या उत्पादनात वाढ करणे, पारंपरिक पिकांबरोबरच फळबाग लागवडीखालील क्षेत्रफळात वाढ करणे, फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे आदी उद्देशातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड केली जाते. सन २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यात ४७५ गावांमधील १७२० हेक्टर क्षेत्रफळावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे. आतापर्यंत १३३७ शेतकरी तसेच ११६६.१४ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी १०३९.१४ हेक्टर क्षेत्रावरील लागवड प्रस्तावाला तांत्रिक, तर ८३८.४९ हेक्टरवरील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत यापैकी ४२० शेतकऱ्यांनी ३७४ हेक्टरवर फळबाग लागवड केली. वाशिम तालुक्यातील ५६ गावात ३०० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ८५ शेतकरी तसेच ७५ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी केवळ तीन शेतकऱ्यांनी तीन हेक्टरवर फळबाग लागवड केली. रिसोड तालुक्यातील ७८ गावात २२० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. 
आतापर्यंत ३१० शेतकरी तसेच २५७ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी केवळ २८ शेतकऱ्यांनी २४.५० हेक्टरवर फळबाग लागवड केली. मानोरा तालुक्यातील ४१ गावांत २२० हेक्टरचा लक्ष्यांक आहे. 
आतापर्यंत १२८ शेतकरी तसेच १२३ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी ७८ शेतकऱ्यांनी ७२ हेक्टरवर फळबाग लागवड केली. कारंजा तालुक्यातील १६५ गावांत ३४० हेक्टरचा लक्ष्यांक आहे. आतापर्यंत १२८ शेतकरी तसेच १२१.१४ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. यापैकी केवळ ३० शेतकऱ्यांनी ३० हेक्टरवर फळबाग लागवड केली.


मालेगाव, मंगरूळपीर तालुका आघाडीवर
फळबाग लागवडीत मालेगाव व मंगरूळपीर तालुका आघाडीवर असल्याचे दिसून येते. मालेगाव तालुक्यातील ५२ गावात ३०० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३२० शेतकरी तसेच २६५.५ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. २६५.५ हेक्टर क्षेत्रावरील लागवड प्रस्तावाला तांत्रिक तर २४४.१९ हेक्टरवरील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापैकी १२२ शेतकºयांनी ११० हेक्टरवर फळबाग लागवड केली. मंगरूळपीर तालुक्यातील ८३ गावात ३४० हेक्टरचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ३६६ शेतकरी तसेच ३२४.५ हेक्टर लागवड क्षेत्र निवडण्यात आले. ३२४.५ हेक्टर क्षेत्रावरील लागवड प्रस्तावाला तांत्रिक तर २६९.४ हेक्टरवरील प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापैकी १५९ शेतकºयांनी १३४.५० हेक्टरवर फळबाग लागवड केली.

Web Title: Orchard cultivation under Employment Guarantee Scheme slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.