३४ शाळा, ३२ तुकड्यांना २० टक्के वाढीव अनुदानाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:19+5:302021-03-26T04:41:19+5:30
वाशिम : राज्यातील विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्त्वावर मान्य दिलेल्या २० टक्के अनुदान सुरू असलेल्या खासगी माध्यमिक शाळा, तुकड्यांना ...
वाशिम : राज्यातील विनाअनुदान व कायम विनाअनुदान तत्त्वावर मान्य दिलेल्या २० टक्के अनुदान सुरू असलेल्या खासगी माध्यमिक शाळा, तुकड्यांना २० टक्के वाढीव अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १२ फेब्रुवारी २०२१ रोजी घेतला. या निर्णयानुसार वाशिम जिल्ह्यातील ३४ शाळा आणि ३२ तुकड्यांना २० टक्के वाढीव अनुदान मिळणार असून, या शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या वाशिम जिल्ह्यातील ३४ शाळा आणि ३२ तुकड्यांंना वाढीव अनुदानाचे २३ मार्चपासून वितरित केले जात आहेत.
शासन निर्णयान्वये विनाअनुदान तत्त्वावर मान्यता दिलेल्या व यापूर्वी २० टक्के अनुदान सुरू असलेल्या खासगी माध्यमिक शाळा, तुकड्यांवरील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ नोव्हेंबर २०२० पासून वाढीव २० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने १२ फेब्रुवारी २०२१च्या निर्णयाद्वारे दिले. त्यानुसार वाशिम जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षकांनी शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या शाळांचे वाढीव २० टक्के अनुदानाचे आदेश १९ मार्च रोजी काढले. शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या शाळांचे आदेश वाशिम येथील शिवाजी हायस्कूलमधून २३ मार्चपासून हस्तगत करण्याच्या सूचनाही जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या संदर्भातील पत्राद्वारे संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना दिले. वाशिम जिल्ह्यातील ३४ शाळांमधील १७० शिक्षक आणि १७० शिक्षकेतर कर्मचारी, तर ३२ तुकड्यांवरील १५१ शिक्षकांना या वाढीव अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
----------
अपात्र शाळांना शासनाच्या घोषणेनंतरच अनुदान
शासनाच्या संदर्भीय निर्णयानुसार सहपत्र क्र. १ व प्रपत्र क्र. २ मधील अपात्र ठरलेल्या शाळांना अद्याप वेतन अनुदानाची कार्यवाही झालेली असून, शासनाकडून शाळा, तुकडी, वर्ग घोषित झाल्यानंतरच अनुदानाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जि. प. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
------------
कोट : शालेय शिक्षण विभागाच्या १२ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या निर्णयान्वये २० टक्के वाढीव अनुदानास पात्र ठरलेल्या खासगी माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील शिक्षक, शिक्षकेतरांना वाढीव अनुदानाचे आदेश काढण्यात आले असून, हे आदेश २३ मार्चपासून हस्तगत करण्याच्या सूचना संबंधित शाळांना देण्यात आल्या आहेत.
-रमेश तांगडे,
माध्यमिक शिक्षणाधिकारी,
जि. प. वाशिम
--------------------
तालुका शाळा शिक्षक शिक्षकेतर
वाशिम १० ५० ५०
कारंजा ०८ ४० ४०
मानोरा ०४ २० २०
मं.पीर ०३ १५ १५
रिसोड ०७ ३५ ३५
मालेगाव ०२ १० ११
========================
एकूण ३४ १७० १७०
========================
तालुका तुकड्या शिक्षक
वाशिम ११ ४८
कारंजा ०२ ११
मानोरा ०६ २०
मं.पीर ०३ ११
रिसोड १८ ४९
मालेगाव ०३ १२
========================
एकूण ४३ १५१