पिकांच्या नुकसानभरपाई मागणीसाठीसाठी राकाँ पदाधिकारी धडकले मंगरूळपीर तहसिलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:36 PM2018-08-29T17:36:12+5:302018-08-29T17:37:51+5:30

मंगरूळपीर (वाशिम) - मंगरुळपीर तालुक्यात संततधार पाऊस झाल्यामुळे  पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २९ आॅगस्ट रोजी तहसिल कार्यालयावर धडक दिली.

In order to compensate demand, agitation Mangrulpir Tahsil | पिकांच्या नुकसानभरपाई मागणीसाठीसाठी राकाँ पदाधिकारी धडकले मंगरूळपीर तहसिलवर

पिकांच्या नुकसानभरपाई मागणीसाठीसाठी राकाँ पदाधिकारी धडकले मंगरूळपीर तहसिलवर

Next
ठळक मुद्देसंततधार पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यात सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, तूर आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मंगरुळपीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तहसिल कार्यालयावर धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर (वाशिम) - मंगरुळपीर तालुक्यात संततधार पाऊस झाल्यामुळे  पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, महसूल विभागाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २९ आॅगस्ट रोजी तहसिल कार्यालयावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.
संततधार पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यात सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, तूर आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. आता सोयाबीन पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांच्या अडचणीत वाढ झाली. कपाशीवरदेखील बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर शेतकºयांना दिलासा म्हणून महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावे, शासनाने नुकसानभरपाई द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात मंगरुळपीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तहसिल कार्यालयावर धडक दिली. शेलुबाजार, कंझरा, त-हाळा, पारवा, आसेगाव, कासोळा, कवठल, दाभा सर्कल मधील शेतकºयांना हेक्टरी ६० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसिलदार वैशाख वाहुरवाघ यांना देण्यात आले. सोयाबीनची पाहणी करून शेतकºयांना योग्य मोबदला देण्यात यावा अन्यथा शेतकºयांच्या हितासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी राकाँचे आर.के. राठोड, भास्कर पाटिल, प्रतिभा महल्ले, ज्योती ठाकरे, शुभदा नायक, रेखा पडवाल, संतोष भगत, वनिता चव्हाण, युनुस खान, देवराव दहाने, सुरेश मुखमाले, राजेंद्र राऊत, सतिष पाटील, साधना व्यवहारे, विष्णु चव्हाण, सुभाष कावरे, खेमसिंग राठोड, विजय जाधव, निलेश राठोड, बंदु पवार, रोहिदास चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Web Title: In order to compensate demand, agitation Mangrulpir Tahsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.