अपुर्ण काम १५ दिवसात पुर्ण करण्याचे आदेश
By admin | Published: July 3, 2014 11:29 PM2014-07-03T23:29:03+5:302014-07-04T00:04:40+5:30
शासकीय योजनेतील अपूर्ण कामे १५ दिवसात पूर्ण करुन अन्यथा कायदेशीर कार्यवाही केली जाईल असे आदेश जि.प.उपाध्यक्ष यांनी दिले
वाशिम: वाशिम पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणार्या विविध शासकीय योजनेतील अपूर्ण कामे १५ दिवसात पूर्ण करुन आर्थिक दृष्टया कामाची अद्यावत माहिती देणारी टिपणी जि.प.ला सादर करा अन्यथा कायदेशीर कार्यवाही केली जाईल असे आदेश जि.प.उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ३ जुलैला वाशिम पं.स.च्या आढावा सभेमध्ये बोलताना दिले यावेळी या आढावा सभेला पं.स.सभापती विरेंद्र देशमुख, प्रभारी गटविकास अधिकारी प्रमोद बदरखे, कॅफो हिवाळे, विस्तार अधिकारी निलेश मोहोडसह पं.स.मधील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
वाशिम पंचायत समितीमध्ये आज ३ जुलै रोजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी घेतलेल्या आढावा सभेमध्ये १३ वा वित्त आयोग, जनसुविधा विकास योजना, अंगणवाडी बांधकाम नियोजन, आंगणवाडी बांधकाम नियोजन नाबार्ड, दलित वस्ती सुधार योजना तांडावस्ती सुधार योजना तिर्थक्षेत्र विकास धडक सिंचन विहीरी इत्यादी योजनाच्या कामाचा आढावा घेतला व वेळेची कामे वेळीच करुन शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचवा अशा ही सुचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना दिल्या तसेच वैयक्ति लाभाच्या योजनाही तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा व पात्र लाभार्थ्यांची निवड करा असेही त्यांनी सांगितले. शासकीय योजना राबवित असताना हलगर्जी पणा व्हायला नको जि.कामे व योजना अपूर्ण आहेत ती कामे १५ दिवसात पूर्ण करा व तशी अद्यावत माहिती जि.प.ला पाठवा अन्यथा कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जा असे आदेश चंद्रकांत ठाकरे यांनी दिले.