वृक्षलागवडीचा खर्च सामान्य फंडातून करण्याचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 02:24 PM2019-08-10T14:24:04+5:302019-08-10T14:24:09+5:30

सामान्य फंडातून एवढा निधी कसा उभारायचा असा प्रश्न अनेक ग्राम पंचायतींसमोर निर्माण झाला आहे.

Order expenditure of tree plantation from the general fund | वृक्षलागवडीचा खर्च सामान्य फंडातून करण्याचा फतवा

वृक्षलागवडीचा खर्च सामान्य फंडातून करण्याचा फतवा

googlenewsNext

रिसोड : ग्राम पंचायतींना ३२५० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असून, २२५० रोपट्यांच्या लागवडीचा खर्च हा सामान्य फंडातून करण्याचा फतवा रिसोड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी काढला आहे. सामान्य फंडातून २२५० रोपट्यांची लागवड केली तरच नरेगातून १००० रोपट्यांचे हजेरीपत्र काढले जाणार आहे. या प्रकाराला सरपंचांनी विरोध दर्शविला आहे.
रिसोड तालुक्यातील प्रत्येक ग्राम पंचायतला यावर्षी ३२५० वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. दमदार पावसाच्या भरवशावर अनेक ग्राम पंचायत प्रशासन हे वृक्षलागवडीचे नियोजन करीत असताना ७ आॅगस्ट रोजी गटविकास अधिकाºयांनी ग्रामसेवक आणि ग्रामरोजगार सेवकांना एक पत्र पाठवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (मनरेगा) केवळ १००० वृक्ष लागवड करावी आणि २२५० वृक्षलागवड ही ग्राम पंचायतच्या सामान्य फंडातून करावी, अशा सूचना गटविकास अधिकाºयांनी दिल्या आहेत. सामान्य फंडातून २२५० वृक्षाची लागवड केली तरच १००० वृक्षाचे हजेरीपत्रक काढण्यात येईल अन्यथा काढता येणार नाही, असा इशाराही दिला. ज्या ग्राम पंचायतींनी सामान्य फंडातून खर्चाची तरतूद केली नाही, त्या ग्राम पंचायतच्या हजेरीपत्रकात गैरहजेरी मांडण्याचा धडाका सुरु झाला आहे. या प्रकारामुळे ग्राम पंचायतच्या पदाधिकाºयांमधून रोष व्यक्त होत आहे. १००० वृक्ष लागवडीचे तीन वर्षाचे १२ ते १३ लाख अंदाजपत्रक खर्च आहे. तो ‘मनरेगा’तून होणार आहे तर २२५० वृक्षाची तीन वर्षीय अंदाजपत्रीय खर्च हा जवळपास ३० ते ३२ लाख असणार आहे. एवढा खर्च तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायत करू शकणार नाहीत. लागवड केलेली झाडे दिड वर्षे जीवंत ठेवण्याचे हमीपत्र सरपंच, सचिवांकडून भरून घेण्यात आले आहे.
सामान्य फंडातून एवढा निधी कसा उभारायचा असा प्रश्न अनेक ग्राम पंचायतींसमोर निर्माण झाला आहे. गटविकास अधिकाºयांच्या त्या पत्रामुळे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही, याबाबत ग्राम पंचायत पदाधिकाºयांमधून साशंकता वर्तविली जात आहे. 
याबाबत गटविकास अधिकाºयांना विचारणा केली,  ग्राम पंचायतजवळ पैसे नसतील तर मनरेगाअंतर्गतही वृक्षलागवड करू नका, असे त्यांनी स्पष्ट केले.

 
आमच्या ग्राम पंचायतची वार्षिक कर वसुली ५० हजाराच्या आत आहे. त्यातुन वृक्षलागवडीवर लाखो रुपये कसे खर्च करावे हा प्रश्न या आदेशामुळे पडला आहे. 
- शोभाताई विजयराव अवचार 
उपसरपंच, ग्रा.प. किनखेडा ता. रिसोड

Web Title: Order expenditure of tree plantation from the general fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.