वीजबिलामुळे सामान्य ग्राहक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:30+5:302021-06-30T04:26:30+5:30
००००००० किसान सन्मान निधीची प्रतीक्षा वाशिम : संपूर्ण देशभरात ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ राबविली जात आहे; परंतु चिखली, ...
०००००००
किसान सन्मान निधीची प्रतीक्षा
वाशिम : संपूर्ण देशभरात ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ राबविली जात आहे; परंतु चिखली, कवठा, किनखेडा, व्याड परिसरांतील काही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. शेवटच्या टप्प्यातील निधी देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी केली आहे.
0000
कृषी सेवा केंद्रांची तपासणी
वाशिम : निर्धारित किमतीपेक्षा अधिक दराने खत, कीटकनाशक, बियाण्यांची विक्री होत आहे का?, आवश्यक ते दस्तावेज कृषी विक्रेत्यांकडे आहेत का?, या संदर्भात कृषी विभागाच्या पथकामार्फत कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली जात आहे.
००००
आधार नोंदणी होतेय पूर्ववत
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधार नोंदणी केंद्र मध्यंतरी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे बालकांची आधार नोंदणी प्रभावित झाली होती. आता अनलॉक असल्याने आधार नोंदणी पूर्ववत होत आहे.
000000000000
शेलगाव येथे तीन कोरोना रुग्ण
वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील शेलगाव येथील तिघाजणांचा कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्यविषयक काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने मंगळवारी केले.