मंगरुळपीर येथे शिवजयंती निमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:22 PM2018-02-16T13:22:47+5:302018-02-16T13:26:10+5:30
मंगरुळपीर - दरवर्षी प्रमाणे स्थानिक शिवनेरी चौकात शिवनेरी प्रतिष्ठाण व्दारा सार्वजनिक शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन केल्या जाते.
मंगरुळपीर - दरवर्षी प्रमाणे स्थानिक शिवनेरी चौकात शिवनेरी प्रतिष्ठाण व्दारा सार्वजनिक शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन केल्या जाते. जयंती दरम्यान कबड्डीचे खुले सामने हजारो रुपयांची बक्षीस व प्रमाणपत्र देवुन खेळाडूंना गौरविल्या जाते. १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन कबड्डीचे खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सामन्याचे उद्घाटक लक्ष्मीकांत महाकाळ तर माजी न.प.अध्यक्ष चंदुभाऊ परळीकर यांचे अध्यक्षतेत जयंती सोहळा पार पडणार असुन उपस्थितीत राहण्याचे आवाहन आयोजक भास्कर पाटील मुळे यांनी केले.
यावेळी कबड्डी सामन्याचे प्रथम बक्षीस १५ हजार रुपये सचिन परळीकर, हरिष बियाणी, पंकज धोपे यांच्याकडून तर व्दितीय १० हजार बबलु गावंडे, विनोद गुजर, अॅड.मनोज येवले, शाम खोडे यांच्यावतिने देण्यात येणार आहे. तीसरे बक्षिस ७ हजार रुपये संजय मिसाळ, हरिष महाकाळ, गजानन नाईक, चवथे ५ हजार रुपये साहेबराव भगत, बाळु पाटील अशी बक्षीसे वरील व्यक्तीकडून प्रदान करण्यात येणार तर कबड्डीचे सामन्यातील आणखीही अंतर्गत बक्षीसे ठेवण्यात आली. यावेळी सामने सांभाळण्याचे पंच म्हणुन आनंद पाटील, विनोद जाधव, रणजीत जाधव, वसंतराव भोंडणे, प्रमोद चौधरी, नंदु भुजाडे, गजानन खोडके, महादेव विश्वकर्मा, नंदु भुजाडे हे काम पाहतील तर मार्गदर्शक भागवत महाले, रामनाथ नवघरे, धामणकर , साहेबराव उगले हे राहणार आहेत. शिव जयंतीचे आयोजक भास्कर मुळे ,ग्यानु भडांगे, संतोष गावंडे, दगडु इंगोले, मंगेश तिडके, राजेंद्र खिराडे, संजय गिरी, निखील हिरवकर गोपाल खाडे आहेत.