वाशिम जिल्हा कृषी विभागातर्फे तालुकानिहाय सभांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 06:24 PM2018-02-07T18:24:05+5:302018-02-07T18:26:28+5:30

वाशिम : कामाच्या संदर्भात प्रत्यक्ष काम करतांना येणाºया अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय शेतकºयांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

Organizing Taluka-wise meetings of Washim District Agriculture Department | वाशिम जिल्हा कृषी विभागातर्फे तालुकानिहाय सभांचे आयोजन

वाशिम जिल्हा कृषी विभागातर्फे तालुकानिहाय सभांचे आयोजन

googlenewsNext
ठळक मुद्देगुरुवार, ८ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२.३० वाजता रिसोड, मालेगांव व कारंजा या ठिकाणी तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये सभा होईल. ९ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२.३० वाजता मानोरा व मंगरुळपीर तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये सभा होईल. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठीची अर्ज प्रक्रिया आदींची माहिती दिली जाणार आहे.

वाशिम : जिल्ह्यातील कृषि यांत्रिकीकरण, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, फलोत्पादन अस्तरीकरण व कांदा चाळ या बाबींसाठी अर्ज केलेल्या शेकºयांना कृषि विभागामार्फत यापुर्वीच पुर्वसंमती देण्यात आलेली आहे. या कामाच्या संदर्भात प्रत्यक्ष काम करतांना येणाºया अडीअडचणी सोडविण्यासाठी तालुकानिहाय शेतकºयांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

गुरुवार, ८ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२.३० वाजता रिसोड, मालेगांव व कारंजा याठिकाणी तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये त्या-त्या तालुक्यातील शेतकºयांना सभा होईल. तसेच ९ फेब्रुवारी २०१८ रोजी दुपारी १२.३० वाजता मानोरा व मंगरुळपीर तालुका कृषि अधिकारी कार्यालयामध्ये संबंधित तालुक्यांची सभा ठेवण्यात आलेली आहे. यावेळी संबंधित लाभार्थींना येणाºया अडचणी समजून घेण्यात येतील. त्यानंतर या अडचणींचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठीची अर्ज प्रक्रिया आदींची माहिती दिली जाणार आहे. अर्ज केलेल्या शेतकºयांनी या सभेस हजर राहून वरील योजना राबविण्यासंदर्भात अडचणी सोडवून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले.

Web Title: Organizing Taluka-wise meetings of Washim District Agriculture Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम