अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:31+5:302021-06-29T04:27:31+5:30

डॉ. शिंगणे म्हणाले की, पूर्वी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष होता. त्यामुळे याहीवेळेस राष्ट्रवादीचाच अध्यक्ष झाला पाहिजे. यासाठी सर्वांनी कामाला ...

Otherwise be prepared to fight on your own! | अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा !

अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा !

Next

डॉ. शिंगणे म्हणाले की, पूर्वी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा अध्यक्ष होता. त्यामुळे याहीवेळेस राष्ट्रवादीचाच अध्यक्ष झाला पाहिजे. यासाठी सर्वांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून कोरोनामुळे मदतीला विलंब होत असल्याचेही त्यांनी सांगितले. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा संपर्क मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, पक्षनिरीक्षक डॉ. संजय रोडगे, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे तर महिला निरीक्षक मंदाताई देशमुख तसेच बाबाराव पाटील खडसे, दिलीपराव जाधव, दत्तराव डहाके, देवेंद्र पाटील ताथोड, वसंतराव पाटील शेगीकर, श्रीधर कानकिरड, वसंतराव पाटील, बाबाराव पाटील ठाकरे, सुरेश गावंडे, राजू गुल्हाणे, शुभदा नायक, विनोद पट्टेबहादूर, पवन राऊत, प्रमोद चौधरी, नूतन राठोड, अ‍ॅड. संजय पोफळे, विठ्ठलराव काळबांडे, सुभाष चौधरी, श्याम देवळे, संजय मापारी शेख वैयोद्दीन, श्याम जाधव आदींची उपस्थिती होती. जि.प. व पं.स. पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम कार्यक्रमात खा. राजीव सातव, माजी आमदार प्रकाशदादा डहाके, पुंडलिकराव ठाकरे, गोविंदराव पाटील, जावेद पहेलवान आदींच्या अकाली निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. राकाँ जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, अ‍ॅड. पोफळे, दिलीप जाधव, बाबाराव पाटील खडसे, देवेंद्र ताथोड, दत्तराव डहाके, सुभाषराव चौधरी आदींनीही आपले विचार व्यक्त केले.

^^^^^^^^^^^^^^^^

चौकट

मोदी सरकारला कोरोनाची चिंता नाही

जेव्हा देशात कोरोनाचा कहर होता तेव्हा पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा बंगाल, केरळच्या निवडणुकीत व्यस्त होते. कोरोनाची कोणतीच चिंता न करता केवळ पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पराभूत करण्यात मश्गूल होते, असा टोला ना. शिंगणे यांनी यावेळी लगावला.

^^^^^^^^^^^^

चौकट

भाजपला ओबीसींच्या मुद्यावर आंदोलनाचा अधिकार नाही

तत्कालीन भाजप सरकारने ओबीसींच्या आरक्षणाकरिता नेमलेला मागासवर्गीय आयोग कोर्टात टिकला नाही. त्यांनी नेमलेलेच वकील आम्ही कायम ठेवले. कोर्टाकडे ओबीसींची आकडेवारी सादर केली नाही. त्यांच्यामुळेच ओबीसींच्या आरक्षणावर गंडांतर आले व निवडणुका लागल्या. आज तेच राज्यात ओबीसींच्या आरक्षणाकरिता आंदोलन करीत आहेत. त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकारच नसल्याचे ना. शिंगणे म्हणाले.

Web Title: Otherwise be prepared to fight on your own!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.