...अन्यथा इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंदच ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:28 AM2021-07-15T04:28:06+5:302021-07-15T04:28:06+5:30
वाशिम येथे मेस्टाच्या जिल्हा संघटनेची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी विदर्भ अध्यक्ष अभिजित देशमुख होते. राज्य सदस्य राहुलदेव मनवर, विभागीय ...
वाशिम येथे मेस्टाच्या जिल्हा संघटनेची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी विदर्भ अध्यक्ष अभिजित देशमुख होते. राज्य सदस्य राहुलदेव मनवर, विभागीय सचिव संतोष गडेकर, जिल्हाध्यक्ष सुभाष बोरकर, सचिव जगदीश काळे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना किनकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील इंग्रजी शाळांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पालकांनी वर्षभर पाल्याला ऑनलाईन शिकवून घेतले; मात्र शाळांचे शुल्क भरले नाही. यामुळे शाळांकडे शिक्षकांचे व इतर खर्चाचे लाखो रुपये थकीत आहेत; मात्र सत्रअखेरीस पालक आपल्या पाल्याचे दाखलेसुद्धा शाळेची फी न भरता मागत आहेत. शाळांच्या महिला कर्मचाऱ्यांशी वाद घालत आहेत. त्यांना अपमानित करीत असल्याची बाब मेस्टाने निवेदनात नमूद केली. अशा पालकांपासून पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली.
.......................
बाॅक्स :
पालकांना शुल्कात २५ टक्के सूट
शिक्षणाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत शाळांनी पालकांना शुल्कामध्ये सूट देण्यासंबंधी चर्चा झाली. विद्यार्थ्यांना आधीच २५ टक्के सूट दिल्याचे शाळा संचालकांनी शिक्षणाधिकारी रमेश तांगडे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हाभरातील संस्थाचालकांची उपस्थिती होती.