अन्यथा सेविकांचे मोबाइल वापसी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:12+5:302021-08-13T04:47:12+5:30
प्रकल्प अधिकारी मानोरा यांना १० ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कामकाजासाठी शासनाने दिलेला मोबाइल अत्यंत निकृष्ट ...
प्रकल्प अधिकारी मानोरा यांना १० ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कामकाजासाठी शासनाने दिलेला मोबाइल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून, तो जुना झाल्यामुळे सतत नादुरुस्त होतो. माेबाइल दुरुस्तीकरिता खर्च येतो व तो सेविकांकडून वसूल केला जातो. दिलेला मोबाइल परत घ्यावा व नवीन चांगला मोबाइल द्यावा. केंद्र सरकारने लादलेला पोषण ट्रकर ॲप सदोष असून, तो रद्द करावा, मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता नियमित द्यावा व त्यामध्ये वाढ करावी, कर्मचारी यांना अरिरिक्त प्रभार न देता रिक्त पदे भरावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. मागण्या मान्य न केल्यास १७ ऑगस्टपासून कधीही मोबाइल वापसी आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर प्रमिला उजवे, आर. वाय. इंगोले, शिला डेरे, शोभा भगत, भाग्यश्री डेरे, अन्तकला मनवर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.