जिल्ह्यातील २७४ ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र’ कार्यान्वित!
By admin | Published: May 1, 2017 02:14 AM2017-05-01T02:14:52+5:302017-05-01T02:14:52+5:30
वाशिम- महत्वाचे दस्तावेज गावातच मिळू लागल्याने ग्रामस्थांची सोय झाली असून ४९३ पैकी २७४ ग्रामपंचायतींमध्येही ही सुविधा कार्यान्वित झाली आहे.
वाशिम : ग्रामविकास विभागाच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ उपक्रमामुळे अनेक प्रकारचे महत्वाचे दस्तावेज गावातच मिळू लागल्याने ग्रामस्थांची सोय झाली असून ४९३ पैकी २७४ ग्रामपंचायतींमध्येही ही सुविधा कार्यान्वित झाली आहे.
सहकारी संस्थांची नोंदणी करणे, सहकारी संस्थांची उपविधी दुरूस्त करणे, सावकारी व्यवसायाकरिता परवाना देणे, परवाना नुतनीकरण करणे, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानवी अधिहस्तांतरण यासह ग्रामपंचायतींअंतर्गत पुरविल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना ग्रामस्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी सहकारी, पणन व वस्त्रोद्योग विभागाने ‘आपले सहकार सेवा केंद्र’, हा उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या ‘संग्राम’ कार्यप्रणालीप्रमाणेच या नव्या उपक्रमाचे स्वरूप असणार असून ‘संग्राम’साठी दिलेले संगणक, प्रिंटर यासह इतर साहित्य हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सद्या सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.