वाशिम जिल्हय़ातील १२५ पैकी ५0 प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’!
By admin | Published: August 4, 2016 02:01 AM2016-08-04T02:01:56+5:302016-08-04T02:01:56+5:30
२४ तासांत जिल्ह्यात सरासरी १५.८५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद .
वाशिम,दि. ३- गत चार दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ५0 प्रकल्प ह्यओव्हर फ्लोह्ण झाले असून, एकूण १२५ जलप्रकल्पांत सरासरी ५६.८६ टक्के जलसाठा झाला आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १५.८५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे.
वाशिम जिल्ह्यात एकूण १२५ प्रकल्प असून, यामध्ये तीन मध्यम व १२२ लघू प्रकल्प आहेत. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस असल्याने जलाशयांमधील जलसाठय़ात प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्या एकबुर्जी या मध्यम प्रकल्पाने १00 टक्क्याचा आकडा गाठला असून, सांडव्यावरून पाणी वाहत आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या सोनलमध्ये ८0 टक्के व अडाण प्रकल्पात ६२.३६ टक्के जलसाठा आहे. उर्वरित १२२ लघू प्रकल्पात सरासरी ५३.५८ टक्के जलसाठा आहे. तीन मध्यम प्रकल्पात सरासरी ६७.७८ टक्के जलसाठा आहे.
वाशिम तालुक्यातील ३१ लघू प्रकल्पात सरासरी ४८.३४ टक्के जलसाठा आहे. मालेगाव तालुक्यातील २२ प्रकल्पात ५४.८७ टक्के, रिसोड १७ प्रकल्पात १६.९७ टक्के, मंगरुळपीर १५ प्रकल्पात ७३.0७ टक्के, मानोरा २३ प्रकल्पात ७९.५३ टक्के तर कारंजा तालुक्यातील १४ प्रकल्पात सरासरी ५५.0६ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ३५ प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत. ७५ ते ९0 टक्क्यादरम्यान जलसाठा असणार्या प्रकल्पांची संख्या १९ आहे. रिसोड तालुक्यात एकूण सरासरीच्या ६७ टक्के जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. तथापि, प्रकल्प परिसरात पावसाचा जोर अधिक नसल्याने प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा नाही. सर्वात कमी जलसाठा रिसोड तालुक्यातील प्रकल्पात सरासरी केवळ १६.९७ टक्के आहे. सर्वाधिक जलसाठा मानोरा तालुक्यातील प्रकल्पांमध्ये आहे.
जिल्ह्यातील एकूण ५0 प्रकल्प ह्यओव्हर फ्लोह्ण झाले असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील १८, मानोरा १३, मालेगाव आठ, कारंजा सहा, मंगरुळपीर चार आणि रिसोड तालुक्यातील एका प्रकल्पाचा समावेश आहे.