वाशिम जिल्ह्यात दीड वर्षांत १९०० पैकी केवळ ९३६ शेततळी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 01:36 PM2017-12-20T13:36:54+5:302017-12-20T13:40:10+5:30
वाशिम : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. दीड वर्षांत १९०० पैकी केवळ ९३६ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले.
वाशिम : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनाला पेलावे लागणार आहे. दीड वर्षांत १९०० पैकी केवळ ९३६ शेततळ्यांचे काम पूर्ण झाले.
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी, तसेच अनिश्चित झाले आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पूर्णत: पावसावर अवलंबून असलेल्या पिकांवर तसेच उत्पादनावर विपरित परिणाम जाणवतो. शेती उत्पादनात शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अंमलात आणली. यासाठी शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान दिले जाते.
या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यासाठी प्रारंभी १८०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. नंतर त्यात वाढ करून १९०० शेततळ्यांचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. वाशिम जिल्ह्याचा भूस्तर समान नसून, जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवघ्या पाच फुट खोलवरच खडक लागतो. त्यामुळे शेतकºयांना निर्धारित अनुदानात शेततळ्यांचे खोदकाम करणे शक्य होत नाही. शासनाने शेततळ्यासाठी ५० हजार रुपये आर्थिक अनुदानाची मर्यादा घालून दिली असताना अनेक शेतकºयांना या रकमेपेक्षा दुपटीहून अधिक खर्च करून शेततळे तयार करावे लागले. या कारणामुळेच अनेक शेतकरी योजनेचा फायदा घेण्यास उत्सूक नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. शेतकºयांना योजनेतंर्गत खोदकामाच्या नंतर अनुदान प्राप्त होते. सुरुवातीलाच पैसा खर्च करावा लागत असल्याने अल्पभूधारक शेतकºयांची इच्छा असताना आणि जमीन शेततळ्यासाठी योग्य असताना पैशाअभावी अडचणी निर्माण होतात, असे मत देऊळगाव बंडा येथील प्रगतशील शेतकरी सोनुबाबा सरनाईक यांनी व्यक्त केले. जिल्ह्यात आतापर्यंत ९३६ शेततळी पूर्ण झाली आहेत.
या योजनेंतर्गतचे अनुदान दीड लाख रुपये केल्यास शेतकºयांसाठी ही बाब सोयीची ठरणारी राहिल. शासनाने शेतकºयांची रास्त मागणी विचारात घेऊन या योजनेंतर्गतचे अनुदान दीड लख रुपये करावे, अशी मागणी सोनुबाबा सरनाईक, पंजाबराव अवचार, गजानन अवचार, डॉ. संतोष बाजड यांनी केली.शेततळ्याचे उद्दिष्ट गाठण्याची कसरत !