बियाण्यांसाठी ३४ हजार अर्जांतून २४९८ शेतकऱ्यांचेच नशीब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:31 AM2021-06-04T04:31:06+5:302021-06-04T04:31:06+5:30

वाशिम : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून, ...

Out of 34 thousand applications for seeds, only 2498 farmers got lucky! | बियाण्यांसाठी ३४ हजार अर्जांतून २४९८ शेतकऱ्यांचेच नशीब !

बियाण्यांसाठी ३४ हजार अर्जांतून २४९८ शेतकऱ्यांचेच नशीब !

Next

वाशिम : शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून, अनुदानित बियाण्यांसाठी अंतिम मुदतीपर्यंत ३४ हजार १२८ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यापैकी केवळ २४९८ शेतकऱ्यांनाच ‘लॉटरी’ लागली असून, उर्वरित शेतकऱ्यांना आता बाजारभावानुसार बियाणे खरेदी करावे लागणार आहे.

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या शीर्षकांतर्गत 'बियाणे' या घटकाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून, यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अंतिम मुदतीपर्यंत ३४ हजार १२८ अर्ज प्राप्त झाले आहेत. सोयाबीन बियाण्यांसाठी २७५९८, तूर ५८८८, मूग ४४७, तर उडीद बियाण्यांसाठी १९५ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. ३४ हजारांवर अर्ज आल्याने अनुदानित बियाणे नेमके कुणाला मिळणार? असा प्रश्न पडला होता. लॉटरी पद्धतीतून २४९८ शेतकऱ्यांची निवड झाली असून, या शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप केले जात आहे.

००००००००००००

अनुदानित बियाण्यांसाठी आलेले अर्ज - ३४,१२८

लॉटरी किती जणांना - २,४९८

.......

कोणत्या तालुक्यात किती

तालुकालाभार्थी

वाशिम ४६६

ािरसोड १३६

मालेगाव ३३०

मंगरूळपीर ८७८

मानोरा ६८८

कारंजा ७९०

००००००००००००००

महागडे बियाणे कसे परवडणार?

प्रतिक्रिया..

महागाईने कळस गाठला !

शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे लागवड खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. यंदा विविध बियाण्यांच्या किमतीही वाढल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे.

- सुखदेव वानखडे, शेतकरी

......

शेतमालाच्या किमतीही वाढवाव्या !

खते, बियाण्यांच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. त्या तुलनेत शेतमालाच्या किमतीत वाढ होत नाही. महागडे बियाणे परवडणारे नसून, बियाण्याच्या किमती कमी कशा होतील? याचाही विचार शासनाने करायला हवा.

- आकातराव सरनाईक, शेतकरी.

.......

सरसकट बियाणे मिळावे !

अनुदानित बियाणे वाटप करताना कोणताही भेदभाव न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट अनुदानित बियाण्याचा लाभ मिळायला हवा. अनुदानित बियाण्याचा लाभ अत्यल्प शेतकऱ्यांना मिळणार असल्याने उर्वरित शेतकरी वंचितच राहतील.

- विनोद सरकटे, शेतकरी

००००००००

Web Title: Out of 34 thousand applications for seeds, only 2498 farmers got lucky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.