शिरपूर येथे डेंग्यूसदृश आजाराची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:45 AM2021-08-24T04:45:53+5:302021-08-24T04:45:53+5:30
शिरपूर येथे गत ३ ऑगस्टपासून आजवर सहा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी काही रुग्णांवर वाशिम तर काही ...
शिरपूर येथे गत ३ ऑगस्टपासून आजवर सहा डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी काही रुग्णांवर वाशिम तर काही रुग्णांवर अकोला येथे उपचार करण्यात आले. आरोग्य विभागाकडून गावात घरोघरी पाणी साठवण असलेल्या पाण्याचे हौद, टाक्यांमध्ये टेमिफास्ट द्रावण मिसळण्यात येत आहे. तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐश्वर्या भालेराव व आरोग्य सहायक बी. ए. गायकवाड यांच्या मार्गदर्शनात आशा सेविका घराघरातील पाणी साठवण्यात येणाऱ्या सिमेंट हौद, टाकी, माठ यामध्ये टेमिफास्ट द्रावण टाकत आहेत, तसेच आरोग्य कर्मचारी रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेण्यात येत आहेत; मात्र धूर फवारणीसाठी आरोग्य वर्धनी केंद्रात आवश्यक ते औषधेच उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे.